उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: जिल्ह्यात महाविकास आघाडीची सरशी, कुठे कुणाची सरशी?

| Updated on: Jan 18, 2021 | 1:51 PM

ओमराजे यांचं मूळ गाव असलेल्या 9 पैकी 6 जागांवर शिवसेनेचा विजय मिळाला असला तरी भाजपनं गोवर्धनवाडीत शिरकाव करत 3 जागांवर विजय मिळवला आहे.

उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: जिल्ह्यात महाविकास आघाडीची सरशी, कुठे कुणाची सरशी?
Follow us on

उस्मानाबाद : शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आगामी काळातील राजकारणासाठी चिंतेची बाब आहे. ओमराजे यांचं मूळ गाव असलेल्या गोवर्धनवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत  9 पैकी 6 जागांवर शिवसेनेचा विजय मिळाला असला तरी भाजपनं गोवर्धनवाडीत शिरकाव करत 3 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटानं ओमराजे यांच्या गावात 3 जागांवर विजय मिळवला आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर गोवर्धनवाडी हे गावं पूर्णपणे ओमराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं होतं. मात्र, आता राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोवर्धनवाडीचा निकाल हा ओमराजे यांच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय झाला आहे.(Results of Gram Panchayat elections in Osmanabad district)

पळसपमध्ये विक्रम काळेंचा डंका

उस्मानाबाद तालुक्यातील पळसप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. पळसप हे विक्रम काळे यांचं मूळ गाव आहे. पळसपमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा सामना होता. पळसप ग्रामपंचायतीत एकूण 13 जागा आहेत. त्यातील 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. 5 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामुळे पळसपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7, शिवसेनेला 5 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आलाय. भाजपला मात्र इथं भोपळाही फोडता आला नाही.

देव धानोऱ्यात आमदार कैलास पाटलांची सत्ता

उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांचं मूळ गाव असलेल्या कळंब तालुक्यातील देवधानोरा इथं शिवसेनेचा मोठा विजय झाला आहे. देवधानोरा इथं शिवसेनेला 9 पैकी 9 जागांवर विजय मिळाला आहे. या गावात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. यात शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या गटानं विजय मिळवला आहे.

अणदूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांना धक्का

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मोठा धक्का बसलाय. कारण, अणदूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वातील पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. अणदूर ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 16 जागांवर मधूकर चव्हाण यांच्या गटातील उमेदवारांचा विजय झाला आहे. तर एक जागा भाजपच्या पारड्यात पडली आहे.

बोर्डा ग्रामपंचायतीत भाजपचं निर्विवाद वर्चस्व

कळंब तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायतीवर राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वातील पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. 7 जागांच्या या ग्रामपंचायतीवर 6 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर एका जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय मिळाला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी चांगलाच जोर लावला होता. पण भाजपचे जिल्हाध्यक्ष नितील काळे यांच्या नेतृत्वातील भाजपच्या पॅनलचा विजय मिळवला आहे.

भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांना धक्का

भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या परंडा तालुक्यातील दत्तक घेतलेल्या लोणी गावात सत्ता पालट झाली आहे. लोणी गावात महाविकास आघाडीनं 9 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे. त्यात शिवसेनेच्या 5, राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांचा विजय झालाय. तर फक्त दोन जागांवर भाजप उमेदवारांचा विजय झाला आहे.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा

mhaisal Gram Panchayat Election Results 2021 : मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, जयंत पाटलांचे सगळेच हरले!

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

Results of Gram Panchayat elections in Osmanabad district