सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता?
या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत.
पंढरपूर : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील गटाची सत्ता आली आहे. अकलून ही 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. त्यापैकी 1 जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यापैकी 13 जागा विजयसिंह मोहिते पाटील गटानं पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला आहे.(The BJP is in power in Akluj, the largest gram panchayat in Asia)
अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते-पाटील गटानं वर्चस्व प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळतंय.
संग्रामसिंह मोहिते-पाटलांचा पराभव
मोहिते-पाटील यांच्या पॅनलचे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील विकास पॅनेलने अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच जोर धरला होता. या पॅनलचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. लोकांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांनी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पॅनलला नाकारल्याचं दिसून येत आहे. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील पॅनलचे गिरीराज माने-पाटील यांनी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केला आहे. तर ज्योती कुंभार यांनी उमा शेटे यांनी पराभव केला आहे. संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी यापूर्वीच अकलूज ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषविलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
माळशिरस तालुक्यात काय स्थिती?
संपूर्ण माळशिरस तालुक्याचा विचार केला तर तालुक्यावर पुन्हा एकदा मोहिते-पाटील गटाचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. कारण माळशिरस तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाचा हा विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आणि भाजपसाठी मोठा विजय ठरला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटानं सत्ता कायम राखली आहे. त्याचबरोबर विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा निकालही जाहीर झाला आहे. विठ्ठलवाडीमध्ये 7 पैकी 7 ही जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटानं आपला झेंडा फडकावला आहे. या विजयानंतर उमेदवारांनी विजयी रॅली काढली. माळशिरससह पंढरपूर आणि सांगोल्यातही भाजपची विजयी घोडदौड पाहायला मिळत आहे.
रेडेर गणेशगाव आणि पिरळे ग्रामपंचायतीवरही भाजपच्या मोहिते पाटील गटाने सत्ता मिळवली आहे. त्याचबरोबर येळीव, विजयवाडी आणि खवळे ग्रामपंचायतीवरही विजयसिंह मोहिते पाटील गटाने विजय मिळवला आहे.
संबंधित बातम्या :
माळशिरस ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मोहिते पाटील गटाचं वर्चस्व कायम, भाजपची घौडदौड
The BJP is in power in Akluj, the largest gram panchayat in Asia