Anil Deshmukh Resignation : अनिल देशमुखांचा राजीनामा, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?

अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Anil Deshmukh Resignation : अनिल देशमुखांचा राजीनामा, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीतून कुणाचं नाव चर्चेत?
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 3:22 PM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागलाय. सचिन वाझेला गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. त्याबाबत अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Ajit Pawar, Jayant Patil, Dilip Walse Patil and Hasan Mushrif are in the running for the post of Home Minister)

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. अशावेळी गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचंही नाव समोर येतंय. तसंच हसन मुश्रीफ हे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळतेय.

जयंत पाटील –

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपदावर वीज कोसळली होती. त्यावेळी डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली. म्हणजेच संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सहन करण्याची ताकद जयंत पाटलांकडे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

अजित पवार –

अजित पवार यांचा दांगडा अनुभव, प्रशासनावरील वचक पाहता अजित पवार यांचंही नाव गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे. पण अजित पवार यांच्याकडे अर्थखात्यासारखी मोठी जबाबदारी आहे. अशावेळी त्यांच्याकडील अर्थखातं काढून गृहखात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असंही बोललं जात आहे.

दिलीप वळसे पाटील –

दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. वळसे पाटील यांना राज्यकारभाराचाही अनुभवही मोठा आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत एक क्लिन इमेज राष्ट्रवादी काँग्रेसला गरजेची आहे. त्यामुळे वळसे-पाटलांकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!

हसन मुश्रीफ तातडेन मुंबईकडे रवाना, गृहमंत्रीपदाचा चार्ज जवळपास निश्चित!

Ajit Pawar, Jayant Patil, Dilip Walse Patil and Hasan Mushrif are in the running for the post of Home Minister

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.