Shivsangram Vinayak Mete Passed Away: आंदोलनं श्वास, आंदोलनंच ध्यास!, मराठा समन्वय समितीच्या बैठकीआधी आयुष्याची संध्याकाळ, वाचा आंदोलनकारी मेटे

shiv sangram Vinayak mete passed away: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Shivsangram Vinayak Mete Passed Away: आंदोलनं श्वास, आंदोलनंच ध्यास!, मराठा समन्वय समितीच्या बैठकीआधी आयुष्याची संध्याकाळ, वाचा आंदोलनकारी मेटे
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 10:31 AM

मुंबई : काही लोक आपल्या कामाप्रति निष्ठा बाळगून असतात. आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ असतात. अन् त्यांच्या आयुष्यातील घटना त्याची साक्ष देत असतात. अश्याच एका ध्येयाप्रती आस्था बाळगून असलेल्या विनायक मेटे (Shivsangram Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालंय. पण त्यांच्या आयुष्याची संध्याकाळही मराठा समाजाच्या प्रश्नासोबतच झाली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आज मराठा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली होती. त्यासाठी विनायक मेटे (Vinayak Mete) पुण्याहून मुंबईला येत होते. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाचं नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. मेटे यांनी अखेरचा श्वासही मराठा समाजाच्या प्रश्नासाठी घेतला. आज बैठक आहे, त्यासाठी राज्यभरातील नेत्यांना फोन करुन हजर राहण्यास त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून मी येतोय, उद्या मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करू, आता आपलं सरकार सत्तेत आलंय, त्यामुळे आरक्षणासह इतर प्रश्नांवर चर्चा करू असं सांगितलं. पण या बैठकीआधीच त्यांचं निधन झालं. त्यामुळे मराठा समाजासह महाराष्ट्र हळहळला आहे.

आंदोलनं श्वास अन् ध्यास!

विनायक मेटे म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज… सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे… मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विनायक मेटे… मराठा समाजाच्या आंदोलनांचा चेहरा… लोकांच्या प्रश्नांसाठी, आंदोलन करणं विनायक मेटेंचा स्वभाव होता. अन् त्यांच्या आयुष्याची संध्याकाळही मराठा समाजाच्या प्रश्नांसोबतच झाली.

हे सुद्धा वाचा

अकाली निधन

विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झालाय.  मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. अपघातात जखमी झाल्यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही. जवळपास एक तासाहून अधिककाळ त्यांना मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागली. उपचारांना उशीर झाल्याने त्यांना जीवाला मुकावं लागल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलाय. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.