33 कोटी वृक्ष लागवड अभियानाच्या चौकशीसाठी विधिमंडळ समितीला मंजुरी, नाना पटोलेंसह 16 सदस्यांचा समावेश

वृक्ष लागवडीची विधिमंडळाच्या समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केली होती. ( Nana Patole 33-crore tree plantation)

33 कोटी वृक्ष लागवड अभियानाच्या चौकशीसाठी विधिमंडळ समितीला मंजुरी, नाना पटोलेंसह 16 सदस्यांचा समावेश
आशिष शेलार, नाना पटोले ,नितेश राणे
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 1:03 PM

मुंबई: तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज्यात राबवलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी विधिमंडळाची 16 सदस्यांची समिती स्थापन करण्यास विधानसभेनं मंजुरी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप आमदार अ‌ॅड. आशिष शेलार आणि नितेश राणे यांच्यासह एकूण 16 सदस्यांची समिती स्थापण करण्यात आली आहे. एएनआय या वृतसंस्थेने याबाबत ट्विट केलं आहे. वन राज्यमंत्री दत्ता भरणे (Dattatray Bharne) यांनी विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभेत केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वृक्ष लागवडीच्या मुद्द्यावरुन विधानसभेते घमासान पाहायला मिळाले. (Maharashtra Legislative Assembly approves constitution of a 16-member committee to look in allegations into 33-crore tree plantation drive under Fadnavis govt )

एएनआयचं ट्विट

नाना पटोले यांची विधिमंडळ समिती स्थापन करण्याची मागणी

वृक्ष लागवड हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, यात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची चौकशी समिती नेमावी, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली होती. एक झाड किती किंमतीला खरेदी केले, कोणत्या नर्सरीमधून खरेदी केली गेली, याची माहिती समोर आली पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले होते.

चौकशी सहा महिन्यात पूर्ण करणार

वृक्ष लागवडीची विधिमंडळाच्या समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केली होती. त्या मागणीवर वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधिमंडळाची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी 2014 ते 2019 या कालावधीत 2 हजार 429 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन मंत्रालयाची धुरा होती.

संबंधित बातम्या:

भरणेंकडून 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची घोषणा, फडणवीस विचारतात मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेस नेत्यांचा जोर

(Maharashtra Legislative Assembly approves constitution of a 16-member committee to look in allegations into 33-crore tree plantation drive under Fadnavis govt )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.