विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकललं जाण्याची शक्यता, कारण काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर, कुठे आणि कधी धेणारे हे अधिकृतरित्या जाहीर करणार, अशी माहिती मिळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुका 10 डिसेंबरला होत आहे. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी सर्व राजकीय पक्षांनी केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर, कुठे आणि कधी धेणारे हे अधिकृतरित्या जाहीर करणार, अशी माहिती मिळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय. (Legislative Winter session likely to be postponed due to Legislative Council elections)
विधान परीषदेच्या निवडणुका येत्या 10 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांची मागणी आहे की हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलावं. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर कुठे आणि कधी घेणार हे अधिकृत जाहीर करणार. सध्या सूत्रांच्या माहीती नुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात येईल अशी माहिती मिळतेय.
विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य कदम रामदास गंगाराम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), पाटील सतेज उर्फ बंटी (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि व्यास गिरीषचंद्र बच्छराज (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यास्तव निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
♦ निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)
♦ नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)
♦ नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार)
♦ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक-26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार)
♦ मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार)
♦ मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
♦ मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021 (मंगळवार)
♦ निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021 (गुरूवार)
अधिवशेन काळात सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश नाही
यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.
डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य
याशिवाय दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आरोग्य विभागाला केली.
इतर बातम्या :
संप मागे घ्या, चर्चा करु; उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब
युती सरकारनं भरती थांबवल्यानं 4 हजार पदं रिक्त; शिक्षण संस्थांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक
Legislative Winter session likely to be postponed due to Legislative Council elections