Video: उदयनराजे म्हणतात तर लोकप्रतिनिधींना गाडा, अजित पवारांच्या उत्तरानं उदयनराजेही हादरतील?

अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकार समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं.

Video: उदयनराजे म्हणतात तर लोकप्रतिनिधींना गाडा, अजित पवारांच्या उत्तरानं उदयनराजेही हादरतील?
अजित पवार उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 3:49 PM

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राज्यातील साखर उत्पादन आणि साखर कारखानदारीसंदर्भात बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केले. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) घेतलेल्या भूमिकेबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकार समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं. यासोबतच उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य केलंय, असं पत्रकारांनी विचारलं असता सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं म्हटलं आहे ना, असा सवाल अजित पवार यांनी केला. तर दुसरीकडे असं बोलणारेही लोकप्रतिनिधीचं आहेत ना, असं देखील अजित पवार म्हणाले. (Maharashtra Maratha Reservation Deputy CM Ajit Pawar gave answer to BJP MP Udayanraje Bhonsle statement on Political representatives)

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य केलंय, असं पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले. त्यावर “सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं आहे ना…. बोलणारेही लोकप्रतिनिधीच आहेत”, असा सवाल अजित पवार यांनी केला. पवारांच्या या उत्तरावर खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहावं लागणार आहे.

अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलंय. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारला कायदा करण्याची मागणी केलीय. उद्या कोल्हापूरमधे होणार्या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि इतर नेते भुमिका मांडतील. जुलै महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्यामधे मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल. हे सरकार आल्याने विरोधी पक्षातील अनेकांच्या पोटात दुखणे थांबलेले नाही. आज पडेल, उद्या पडेल असं म्हणत ते वेळ काढतायत. दुटप्पी भूमिका घेतायत.

महाविकास आघाडी सरकार भक्कम

महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन बनवलय. हे तिघे नेते जोपर्यंत या सरकारच्या पाठिशी आहेत. तोपर्यंत हे सरकार भरभक्कम आहे. शिवसेना असेल किंवा कॉंग्रेस प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आत्ताचा फॉर्म्युला हा उद्वव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आहे. नानांना त्यांची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी 145 ची मॅजीक फिगर लागते. ती ज्याच्याकडे असते तो मुख्यमंत्री होतो.

राम मंदिर घोटाळ्यासंदर्भात स्पष्टीकरण गरजेचे

राम मंदिर ट्रस्ट घोटाळ्यासंदर्भात काल हेडलाईन सुरू होत्या. राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप होणे खूप गंभीर आहे. सगळ्यांनी त्याला देणगी दिली आहे, यावर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे.

मराठवाड्यात ऊस संशोधन केंद्र

आजच्या बैठकीत यंदा साखर उत्पादन जास्त झालं आहे. त्याचा साठा करण्याबाबत चर्चा झाली. साखरेच्या बाय प्रोडक्टमधे वाढ करण्याचा प्रयत्न करणं आणि यातून उसाचा दर वाढवण्यास मदत होईल. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर 128 एकर जागेसाठी टेंडर भरले होते. ते मंजुर झाले. हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे राज्यातील चौथे प्रशिक्षण केंद्र असेल. यामुळे मराठवाड्याला फायदा होईल, असं अजित पवार म्हणाले.

उदयनराजे भोसले यांचा पुण्यात पत्रकारांशी संवाद

संबंधित बातम्या:

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत: संभाजीराजे छत्रपती

उद्रेक झाला तर जबाबदार कोण?, कोर्ट कचेऱ्यांवर विश्वास नाही: उदयनराजे भोसले

(Maharashtra Maratha Reservation Deputy CM Ajit Pawar gave answer to BJP MP Udayanraje Bhonsle statement on Political representatives)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.