अशोकरावांवर आरोप करत रडत रडत शिवसेना सोडण्याची घोषणा, साबणेंच्या आरोपाला आता चव्हाण यांचं प्रत्युत्तर
सुभाष बामणे यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा करताना, "शिवसेनेत माझं कुणाशी वाकडं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय", असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपाला मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नांदेड : शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना देगलूर बिलोली जागेसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. त्यांनी आज भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा करताना, “शिवसेनेत माझं कुणाशी वाकडं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय”, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपाला मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी काँग्रेसमध्ये आहे, त्यांचा आणि माझा संबंध काय?
अशोक चव्हाण यांच्या एकाधिकार शाहीला वैतागून शिवसेना सोडल्याचा आरोप सुभाष साबणे यांनी केलाय. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री चव्हाण यांनी त्यांचा आणि माझा संबंधच काय? असा सवाल उपस्थित केलाय. त्यांच्या पक्षाबाबत त्यांनी बोलावं, मी काँग्रेसमध्ये आहे अशीही आठवण त्यांनी करून देत साबणेंना चिमटा काढलाय.
साबणे मुळातच शिवसेनेचे आहेत. मी काँग्रेस पक्षामध्ये आहे. मग त्यांचा आणि माझा काय संबंध?, असा सवाल करत साबणे यांनी शिवसेनेच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असं अशोक चव्हाण म्हणाले. तर जाणारा काहीतरी बोलून जातो, असं सांगायला देखील अशोक चव्हाण विसरले नाहीत.
सुभाष साबणेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!
शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण करत आहेत. उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत त्यांना डावपेच माहीत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यात मास्टर झालेली लोक आहेत. पायातपाय घालण्यात आणि राजकारणात हे पीएचडी झालेली माणस आहेत. शिवसेनेचे यामुळे मोठं नुकसान आहे, असे गंभीर आरोप करत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
“माझ्या सारखी परिस्थिती अनेकांची आहे. माझ्या सारख्या अनेक लोकांची इच्छा आहे की शिवसेनेने आता या महाविकास आघाडीतून बाहेर यावं. आमदार आणि खासदारांची हीच इच्छा आहे. मी जर सहन करून बसलो असतो तर आता काँग्रेस ला मतदान मागितलं असतं आणि मग 2024 ला कुणासाठी मतदान मागितलं असतं”, असा सवाल सुभाष साबणे यांनी केला आहे. “आज पंज्याला मतदान द्या असं म्हणायचं आणि मग 2024 ला कुणाल मतदान द्या म्हणून सांगायचं?, असाही सवाल सुभाष साबणे यांनी केला.
भाजप प्रवेश करताच साबणेंना उमेदवारी जाहीर
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
(Maharashtra Minister Ashok Chavan reply Allegation to Subhash Sabane who join BJP)
हे ही वाचा :