पत्नीची खंबीर साथ, मंत्री संजय राठोड शीतल यांच्यासह पोहरादेवीला रवाना
पोहरादेवीत आल्यावर सुरुवातीला वनमंत्री संजय राठोड जगदंबा मातेचं दर्शन घेतील. (Sanjay Rathod wife Sheetal Rathod)
यवतमाळ : शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) सकाळी पावणेअकरा वाजताच्या सुमारास पोहरादेवीला रवाना झाले. शासकीय वाहनांऐवजी लॅन्ड क्रूझर या खासगी गाडीत ( MH 04 FB 567 ) बसून राठोड कुटुंबीयांसोबत निघाले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan) गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेल्या संजय राठोड यांची पहिली झलक प्रसारमाध्यमांनी टिपली, त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शीतल राठोड होत्या. (Maharashtra Minister Sanjay Rathod leaves Poharadevi from Yawatmal with wife Sheetal Rathod)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांचे सार्वजनिक ठिकाणी दर्शन झाले नव्हते. राठोड काल यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आले. आज सकाळीच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक आणि काही नातेवाईक राठोड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. नेत्यांशी काही वेळ चर्चा केल्यानंतर ते पोहरादेवीकडे जायला निघाले.
80 किलोमीटर प्रवास
संजय राठोड यवतमाळमधील निवासस्थानाहून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीला निघाले. हे अंतर 80 किलोमीटर इतके आहे. जवळपास 15-16 गाड्यांच्या ताफ्यासह राठोड रवाना झाले. या प्रवासात संजय राठोड यांच्यासोबत पत्नी शीतल राठोड, मेहुणे सचिन नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह काही शिवसेना पदाधिकारी असल्याचं सांगण्यात येतं.
पोहरादेवी मंदिरात पूजा
पोहरादेवीत आल्यावर सुरुवातीला वनमंत्री संजय राठोड जगदंबा मातेचं दर्शन घेतील. त्यानंतर पोहरादेवीतील सराव मंदिरात संजय राठोड यांच्या हस्ते पूजेचं नियोजन करण्यात आलं आहे. अशी माहिती पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली.
पोहरादेवी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिरात सजावट करण्यात आली आहे. सुनील महाराज यांच्या वतीने सजावट करण्यात आली आहे. जगदंबा मंदिरात होम हवन आणि पूजेची तयारी करण्यात येत आहे. कोरोनामुळे लोकांनी गर्दी करु नये असं आवाहन आम्ही केलं आहे. संजय राठोड आज शक्तीप्रदर्शन करणार नाहीत, असंही महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.
पोहरादेवीत कडेकोट पोलीस बंदोबस्त
पोहरादेवीत बाँम्ब डिस्पोजल वॅन दाखल झाली असून पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. पोहरादेवीला जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरीकेट्स लावण्याचं काम सुरु आहे. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांकडून काळजी घेतली जात आहे.
दुपारी साडेचार वाजता संजय राठोड यांची यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना नियंत्रणाबाबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ते यवतमाळ निवासस्थानी रवाना होतील. (Maharashtra Minister Sanjay Rathod leaves Poharadevi from Yawatmal with wife Sheetal Rathod)
संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील :
1. आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे प्रस्थान 2. दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील. 3. दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील. 4. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील. 5. संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.
संबंधित बातम्या :
PHOTO: संजय राठोड यांचं शक्तीप्रदर्शन? पोहरागडावर ठिकठिकाणी पोस्टर्स
गबरु, केक आणि बरंच काही, पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा
(Maharashtra Minister Sanjay Rathod leaves Poharadevi from Yawatmal with wife Sheetal Rathod)