मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचं कळतंय. (Shivsena Forest Minister Sanjay Rathod Resignation live updates Pooja Chavan Suicide Case Pune Police)
– पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण,
– पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग गंभीर,
– प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे महिला आयोगाचे पुणे पोलिसांना आदेश,
– पुणे पोलीस लवकर राष्ट्रीय महिला आयोगाला अहवाल सादर करणार,
– सध्या अहवालावर काम सूरु असल्याची माहिती.
महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. कायद्यानुसार तपास सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी तापासाचे आदेश दिले आहेत. संजय राठोड शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. विदर्भातील शिवसेनेचा चेहरा आहेत. विरोधी पक्ष म्हणून हवेत गोळीबार करु नये. संजय राठोडांची भूमिका शांत राहण्याची आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची माहिती चुकीची असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदर संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जळगाव शिवसेना नेते तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची मला आताच माहिती मिळाली. त्यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात घेतले जात सल्याने त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा पक्षाकडे दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. येणाऱ्या काळात या प्रकरणाच्या चौकशीत ‘दूध का दूध, पाणी का पाणी होईल’, असे मत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे आज (मंगळवारी) जळगावात होते.
पूजा चव्हाण प्रकरणाची पूर्ण माहिती घेण्यासाठी आज राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले आहेत.
संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या प्रकरणात जी चौकशी होईल त्यातून सत्य बाहेर येईल. राजीनाम्याबाबत मला काहीही माहितीनाही
जी वस्तुस्थिती आहे ती चौकशीनंतर समोर येईल, असं कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले
पूजा चव्हाण अत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाचे नेते वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर करून बंजारा समाजाची बदनामी होत आहे. त्याविरोधात वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथल्या महंतांनी बैठक घेऊन वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे समाज उभा असल्याचं म्हटलं आहे. समाजाची बदनामी थांबवावी असे आवाहन त्यांनी केले होते. आज त्या अनुषंगाने संजय राठोड याच्या समर्थानात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथं बंजारा समाज समन्वय समितीच्या वतीने पोहरादेवी इथल्या सुनील महाराज व जिंतेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली वसंत शास्त्री पुतळा जवळून निषेध रॅली काढण्यात येणार आहे
संजय राठोडांचा राजीनामा निष्पक्ष चौकशीसाठी घेतला: सूत्रhttps://t.co/atVRNYeisi pic.twitter.com/FrLjoV73wD
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021
राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. पण आता इथून पुढे चौकशी कशी होणार? याकडे विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे. राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली. वनमंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का, हे ही पाहावं लागेल, असंही निलेश राणे म्हणाले.
वनमंत्री संजय राठोड हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही. संजय राठोड विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते, पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण,
– पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी तीन पथकं तैनात,
– पुणे शहर आणि राज्यातील इतर भागात पथकं चौकशीसाठी रवाना,
– तपास पूर्ण झाल्याशिवाय गुन्हा दाखल करणार नसल्याची पुणे पोलिसांची माहिती.
मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करावा: प्रविण दरेकर
वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा.
कारण एकाने ‘मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं’ असं होता कामा नये. तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 16, 2021