Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य

महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु असल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य
vijay wadettiwar
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 10:33 AM

नागपूर :  महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु असल्याचं मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.(Maharashtra Minister Vijay Wadettiwar On Corona Updates And Maharashtra Lokcdown)

विजय वडेट्टीवर नेमकं काय म्हणाले…?

महाराष्ट्रातली एकूण वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. शासन पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. उपाययोजना जरी सुरु असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल, हे आज सांगता येत नसलं तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.

आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणारं नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे पण रुग्ण वाढ होतीय, हे गंभीर आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असं सांगत लॉकडाऊनचा सूचक इशारा मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे.

मुंबईच्या लोकल फेऱ्या कमी होणार? महाराष्ट्रात लॉकडाऊन?

विदर्भातील चार राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रही कोरोनाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सरकार गंभीर असल्यानेच अधिवेशनचा कामकाजाचा कालावधी आठ दिवसांचा ठेवण्यात आला आहे, असं सांगतानाच मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरू आहे, असंही ते म्हणाले. मुंबईत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार

मुंबईत सर्वसामान्यांना लोक सेवा प्रवास सुरु केल्यानंतर कोरोनाचे आकडे वाढायला सुरुवात झाल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मुंबई लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल याचा विचार सुरु आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार” असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

पोहरादेवीच्या गर्दीला जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल

मंत्री संजय राठोड यांच्यावर प्रश्न विचारला असता वडेट्टीवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. पोहरादेवीच्या गर्दीला जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं वडेट्टीवार म्हणाले.

विदर्भात परिस्थिती गंभीर

विदर्भातील चार जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मंगलकार्यालयांवर वॉच ठेवण्यात येत आहे. तसेच सिनेमागृहे बंद करण्याचा विचार सुरू आहे. विदर्भात एक बैठक घेऊन कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने काही कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचं

(Maharashtra Minister Vijay Wadettiwar On Corona Updates And Maharashtra Lokcdown)

हे ही वाचा :

महाराष्ट्राबाहेर जाताय? जरा जपून! या ‘अकरा’ राज्यात नो एन्ट्री; कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक

डियर नीता भाभी और मुकेश भय्या, यह तो सिर्फ ट्रेलर है

पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.