कोल्हापूर : राज्यात सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदरासंघाच्या 6 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेची लढत म्हणून कोल्हापूरच्या लढतीकडं पाहिलं जातंय. कारण, गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाटील यांच्या विरोधात पारंपारिक विरोधक अमल महाडिक हे असणार आहेत. सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी अर्ज दाखल केला. सतेज पाटील यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती सहा वर्षात 16 कोटींनी वाढल्याचं समोर आलं आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या संपत्तीत सहा वर्षात सोळा कोटींची वाढ झाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी पाटील यांनी सादर केलेल्या विवरण पत्रातून ही माहिती समोर आली आहे. तर, सतेज पाटील यांच्यावरील कर्जामध्येही गेल्या सहा वर्षात वाढ झाली आहे. त्यांच्यावरील कर्जात 11 कोटींची वाढ झालीय. सतेज पाटील यांची 2014 मध्ये 23 कोटी 53 लाखाच्या एकूण संपत्तीची नोंद होती. तर, आता त्यांची संपत्ती 39 कोटी 88 लाख रुपयांची असल्याचं नोंद करण्यात आलं आहे. सतेज पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या फौजदारी कारवाईची देखील विवरण पत्रात माहिती दिली आहे.
सतेज पाटील यांचा कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीतर्फे सादर करण्यास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार पी.एन. पाटील उपस्थित होते.
मुहूर्तमेढ विजयाची!
आज कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तर्फे माझा उमेदवारी अर्ज राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील- यड्रावकर, आ. पी.एन. पाटील यांच्या उपस्थितीत दाखल केला. pic.twitter.com/DK4d6L1u52
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 18, 2021
सतेज पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सतेज पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलं. सतेज पाटील यांच्याकडे 270 मतं असल्याचा दावा करण्यात येतोय. दुसरीकडे भाजपकडून अमल महाडिक यांचा अर्ज अद्याप दाखल करण्यात आलेला नाही.
इतर बातम्या:
विधान परिषदेची रणधुमाळी, सतेज पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार, कोल्हापूरमध्ये हाय व्होल्टेज लढत
विधानपरिषदेची हाय व्होल्टेज लढत, सतेज पाटील-अमल महाडिक आमने सामने, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Maharashtra MLC Election 2021 Congress leader satej patil property increased shown in election affidavit