ARMC Election 2022, Ward 32 : अमरावतीच्या प्रभाग 32 मध्ये पुन्हा भाजपलाच विजयाची लॉटरी लागतेय की विरोधकांचे भाग्य उजळतेय? जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती

यंदा महापालिकेचे एकूण 33 प्रभाग असणार असून त्यातील 32 प्रभाग त्रिसदस्यीय असतील, तर एक प्रभाग द्विसदस्यीय असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतून 98 नगरसेवक निवडून महापालिकेत जाणार आहेत. यातील 49 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

ARMC Election 2022, Ward 32 : अमरावतीच्या प्रभाग 32 मध्ये पुन्हा भाजपलाच विजयाची लॉटरी लागतेय की विरोधकांचे भाग्य उजळतेय? जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती
अमरावती महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 6:10 AM

अमरावती : महाराष्ट्रात यंदा अनेक महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. 2024 ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक (General Election) अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकांची निवडणूक (Municipal Corporation Elections) ही लोकसभेची रंगीत तालीम मानली जात आहे. यात आपलाच झेंडा फडकावून मतदारांवर आपली छाप पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहेत. त्यातच अमरावती महापालिका (Amaravati Municipal Corporation) ही 2017 च्या सार्वत्रिक निवणुकीतही आपल्या ताब्यात राखण्यात भाजपने यश मिळवले होते. त्याच विजयाची पुनरावृत्ती भाजप अमरावतीमध्ये करून दाखवतोय का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपाला हा चमत्कार करण्यासाठी सर्वच प्रभागांत दिग्गज उमेदवार रिंगणात उतरावे लागणार आहेत.

यंदा महापालिकेचे एकूण 33 प्रभाग असणार असून त्यातील 32 प्रभाग त्रिसदस्यीय असतील, तर एक प्रभाग द्विसदस्यीय असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतून 98 नगरसेवक निवडून महापालिकेत जाणार आहेत. यातील 49 जागा महिलांसाठी राखीव आहेत. या सर्व बदलत्या राजकीय परिस्थितीत प्रभाग क्रमांक 32 मध्ये आपलाच दबदबा राखण्यासाठी भाजप कोणती व्यूहरचना आखतोय? भाजपला विरोधी पक्ष तगडे आव्हान देताहेत का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 32 ची लोकसंख्या

हा प्रभाग पूर्व बडनेरा या नावाने ओळखला जातो. इथली लोकसंख्या संमिश्र स्वरूपाची आहे. तुलनेत अनुसूचित जमातीचे मतदार कमी असून अनुसूचीत जातीची मते निर्णायक ठरू शकणार आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील ‘व्होट बँक’ आपल्याकडे राखण्यासाठी राजकीय पक्षांची सर्वमान्य उमेदवार रिंगणात उतरवण्याची कसोटी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

एकूण लोकसंख्या : 20619 अनुसूचित जातीची (SC) लोकसंख्या : 4369 अनुसूचित जमातीची (ST) लोकसंख्या : 290

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभागामध्ये नेमक्या कोणत्या विभागांचा समावेश होतो ?

प्रभाग क्रमांक 32 मध्ये सावता मैदान, जुनी वस्ती बडनेरा परिसर, निमकर वाडी, संजीवनी कॉलनी, बारीपुरा चौक, राहुल नगर, निर्मला कॉलनी, रमाबाई आंबेडकर नगर, माताफैल, गांधी विद्यालय परिसर, बडनेरा रेल्वे स्टेशन परिसर, पोलीस वसाहत, शिवाजी नगर, रजा नगर, म्हाडा कॉलनी, शिक्षक कॉलनी, वरुड गाव परिसर या प्रमुख विभागांचा समावेश होतो. यातील काही भागांमध्ये मराठी भाषिकांसह बिगरमराठी भाषिकांचे प्रमाणही तितकेच आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये राजकीय गणिते आखताना सर्वच पक्षांची कसोटी लागणार आहे.

प्रभागातील वॉर्डनिहाय आरक्षण

यंदा या प्रभागातील एक वॉर्ड अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. त्या अनुषंगाने प्रभागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याच अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील तगड्या आणि लोकप्रिय उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. संपूर्ण प्रभागातील आरक्षण पुढीलप्रमाणे –

32 (अ) – अनुसूचित जाती 32 (ब) – सर्वसाधारण महिलांकरिता 32 (क) – सर्वसाधारण

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

महापालिकेच्या मागील निवडणुकीतील राजकीय बलाबल (नगरसेवकांची संख्या)

01. भाजप- 45 02. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) – 15 03. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन -10 04. शिवसेना- 07 05. बहुजन समाज पार्टी (BSP) – 05 06. युवा स्वाभिमान पक्ष (YSP) – 03 07. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)- 01 08. अपक्ष- 01

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 32 मधील राजकीय चित्र बदलते का? पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचेच पारडे जड राहते कि काय? याकडे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.