Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC election 2022 31 : शिवसेना आपला गड शाबूत राखणार की शिंदे गट चमत्कार दाखवणार; जाणून घ्या प्रभागातील सद्यस्थिती

नव्या प्रभाग रचनेनुसार पालिकेची एकूण 44 प्रभाग आहेत. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक 31 मधील निवडणूकही संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणार आहे.

KDMC election 2022 31 : शिवसेना आपला गड शाबूत राखणार की शिंदे गट चमत्कार दाखवणार; जाणून घ्या प्रभागातील सद्यस्थिती
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 1:43 AM

कल्याण : राज्यात सत्ताबदल घडून आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री बनले. या बदललेल्या राजकीय समीकरणाचा यंदा होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांवर परिणाम दिसून येणार आहे. शिंदे यांचे ठाण्यात चांगले राजकीय वजन आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिके (Kalyan Dombivali Municipal Corporation)च्या निवडणुकीतही त्यांचा प्रभाव दिसणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 2015 मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी शिवसेनेने सर्वाधिक 69 टक्के अर्थात 122 पैकी 84 जागांवर भगवा फडकावला होता. यंदा शिंदेंनी बंडाचे निशाण फडकावून मूळ शिवसेनेच्या कायदेशीर वैधतेलाच आव्हान (Challenge) दिले आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार पालिकेची एकूण 44 प्रभाग आहेत. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक 31 मधील निवडणूकही संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणार आहे. शिंदे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका वॉर्ड 31 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 31 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 32791 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 1870 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 329

कल्याण डोंबिवली महापालिका वॉर्ड 31 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
अपक्ष
मनसे/इतर

प्रभागाची हद्द कोठून कुठपर्यंत?

प्रभाग क्रमांक 31 हा कोपरगाव शास्त्रीनगर डोंबिवली पश्चिम या नावाने ओळखला जातो. या प्रभागामध्ये कोपरगाव, साई आर्केड इमारत, सद्गुरू कृपा, स्वामी समर्थ मठ, हिंगलाज अपार्टमेंट, अंबाभवानी मंदिर, श्री साई सखाराम कॉम्प्लेक्स, राजाई टॉवर, शास्त्रीनगर रुग्णालय, नवजीवन साफल्य सोसायटी, पार्वती विहार या प्रमुख विभागांचा समावेश होतो. प्रभागाची हद्द उत्तरेला उल्हास नदीपासून देवीचौकापर्यंत, पूर्वेला देवी चौकापासून मध्य रेल्वे लाईनपर्यंत आहे. दक्षिणेला मध्य रेल्वे लाईनपासून कोपर गावच्या सामायिक महसूल हद्दीपर्यंत, पश्चिमेला भोपर, कोपरगावपासून उल्हास नदीच्या दक्षिणेकडील हद्दीपर्यंत.

हे सुद्धा वाचा

कल्याण डोंबिवली महापालिका वॉर्ड 31 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 31 मधील 2015 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

अरुण गीध – अपक्ष (गीध यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार प्रफुल्ल गवळी यांचा पराभव केला होता.)

महापालिकेच्या 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे सत्तेत होते. मात्र पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी एकमेकांवर कुरघोडी सुरु ठेवल्या होत्या. त्याचा फटका शिवसेनेला प्रभाग क्रमांक 31 मध्ये बसला होता. शिवसेनेचे उमेदवार प्रफुल्ल गवळी यांना अपक्ष उमेदवार अरुण गीध यांच्या विरोधात पराभूत व्हावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सत्तेचे भवितव्य हे शिंदे गटाची भूमिका आणि मनसेच्या रणनीतीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे येथील निवडणुकीतील लढत पाहणे फार रंजक ठरणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.