NMC Election 2022, Ward 52 : भाजपच्या बालेकिल्ल्यात नारीशक्तीचा आवाज कोण बुलंद करणार? जाणून घ्या कुठल्या पक्षाचे भाग्य उजळेल

चालू वर्षीच्या 31 मेपर्यंतच्या मतदार यादीनुसार नागपूर महापालिका निवडणुकीत 22 लाख 45 हजार 809 मतदार आहेत. या मतदारसंख्येनुसार एकूण 52 प्रभाग तयार करण्यात आले असून सर्व प्रभाग तीन सदस्यांचे असतील.

NMC Election 2022, Ward 52 : भाजपच्या बालेकिल्ल्यात नारीशक्तीचा आवाज कोण बुलंद करणार? जाणून घ्या कुठल्या पक्षाचे भाग्य उजळेल
नागपूर महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 3:07 PM

नागपूर : झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेता यंदा होत असलेल्या नागपूर महापालिके (Nagpur Municipal Corporation)तील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी वाढलेल्या प्रभाग संख्येनुसार मातब्बर उमेदवारां (Candidate)ना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. सध्या या महापालिकेवर भाजप (BJP)ची सत्ता होती. केंद्रात आणि राज्यात भाजपचाच दबदबा आहे. त्यामुळे यंदाही नागपूरमध्ये भाजपासाठी अनुकूल वातावरण असल्याचेच चित्र आहे. मात्र विरोधकांच्या व्यूहरचनेवर पालिकेतील भाजपच्या बहुमताचा आकडा अवलंबून असणार आहे. संपूर्ण नागपूर शहराची लोकसंख्या 24 ते 30 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे या शहराच्या महापालिकेचे प्रभाग वाढून आता एकूण 52 झाले आहेत. यातील प्रभाग क्रमांक 52 मध्ये सद्यस्थितीत काय चित्र आहे हे जाणून घेऊया.

नागपूर महापालिका वॉर्ड 52 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

चालू वर्षीच्या 31 मेपर्यंतच्या मतदार यादीनुसार नागपूर महापालिका निवडणुकीत 22 लाख 45 हजार 809 मतदार आहेत. या मतदारसंख्येनुसार एकूण 52 प्रभाग तयार करण्यात आले असून सर्व प्रभाग तीन सदस्यांचे असतील. त्यानुसार 52 प्रभागांमधून एकूण 156 नगरसेवक निवडून महापालिकेवर जाणार आहेत. त्यापैकी 50 टक्के अर्थात 78 जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

प्रभाग क्रमांक 52 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 47044 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 12826 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 3010

हे सुद्धा वाचा

प्रभाग क्रमांक 52 मधील प्रमुख परिसर

नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 52 हा शेवटचा प्रभाग तयार करण्यात आला असून, यामध्ये नरेंद्रनगर, मस्के सले-आऊट, बाबूळखेडा, श्रीनाथ साईनाथ, सेंट्रल रेल्वे कॉलनी, मनिषनगर, सोमलवाडा, न्यू मनीषनगर, जय दुर्गा सोसायटी, चिंचभवन, श्रीनगर, प्रभूनगर, ओंकारनगर, साईकृपा सोसायटी, दांडेकर ले-आऊट या प्रमुख परिसराचा समावेश होतो.

नागपूर महापालिका वॉर्ड 52 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभागाची व्याप्ती कोठून कुठपर्यंत?

उत्तरेला मुंबई-हावडा रेल्वे मार्गा जवळील टी/13 भास्कर छाया अपार्टमेंट बोरकुटे ले-आऊट नरेंद्रनगरपासून रिंगरोडवरील सुयोगनगर चौकापर्यंत व नंतर पूर्व दिशेकडे जाणाऱ्या रिंगरोडवरील ओंकारनगर चौकापर्यंत. पूर्व-दक्षिणेला रिंग रोडवरील ओंकारनगर चौकापासून दक्षिणेकडे जाणाऱ्या बेसा रोडेने कलकुही मार्गापर्यंत व नंतर पुढे शीवनगांव टी-पाईँटपर्यंत. पश्चिमेला कलकुही रस्ता व महापालिका शहर सीमा संगमापासून उत्तरेकडे कलकुही मार्गे शीवनगांव रस्त्यावरील टी-पॉईंटपर्यंत. तसेच पूर्वेकडे शीवनगांव रस्त्याने वर्धा रस्त्यापर्यंत. दक्षिणेकडे वर्धा रस्त्याने मुंबई-हावडा रेल्वे ओव्हर चिंचभवन पुलापर्यंत. उत्तरेकडे मुंबई-हावडा रेल्वे आर्गाने व नरेंद्र नगर येथील रेल्वे मार्गाजवळ बोरकुटे ले-आऊटमधील टी/13 भास्कर छाया अपार्टमेंटपर्यंत प्रभाग क्रमांक 52 ची मोठी व्याप्ती आहे.

प्रभागातील आरक्षण

प्रभाग क्रमांक 52 अ – अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 52 ब – सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 52 क – सर्वसाधारण

नागपूर महापालिका वॉर्ड 52 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

2017 च्या निवडणुकीनंतरचे महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप : 107 काँग्रेस : 28 बसपा : 10 राष्ट्रवादी : 1 शिवसेना : 2 अपक्ष : 1 रिक्त : 2

प्रभाग क्रमांक 52 मध्ये तीनपैकी दोन वॉर्डमध्ये महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. यात राजकीय पक्ष कोणत्या महिला उमेदवारांना तिकीट देऊन महापालिकेतील या प्रभागाचा आवाज बुलंद करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....