Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMMC Election 2022, Ward 32 : भाजप आणि शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’ होण्याची शक्यता; एकनाथ शिंदे गटाची भूमिका ठरणार निर्णायक

यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेपुढे भाजपबरोबरच एकनाथ शिंदे गटाचे आव्हान आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वोट बँकेला सुरुंग लागण्याची दाट शक्यता आहे.

NMMC Election 2022, Ward 32 : भाजप आणि शिवसेनेत 'कांटे की टक्कर' होण्याची शक्यता; एकनाथ शिंदे गटाची भूमिका ठरणार निर्णायक
नवी मुंबई महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 2:18 AM

नवी मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला लागून असलेल्या नवी मुंबईत वेगाने विकास होत आहे. त्यामुळे नवी मुंबई देखील श्रीमंत महापालिकेच्या यादीमध्ये समाविष्ट झाली आहे. पालिकेचे बजेट वर्षागणिक वाढत असून विकासाची गंगा वेगाने प्रवाही राहिल्यामुळे वास्तव्यासाठी लोक या शहराला अधिक पसंती देऊ लागले आहेत. या शहराच्या महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation Election) एप्रिल 2022 मध्ये होणार होती. मात्र ती आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित राहिलेल्या मुद्द्यामुळे रखडली. यंदा निवडणुकीसाठी महापालिका क्षेत्रात 11 नवीन प्रभाग (Ward) वाढले आहेत. त्यामुळे पालिकेच्या एकूण प्रभागांची संख्या 111 वरून 122 झाली आहे. पालिकेचे सर्वच प्रभाग गेल्या काही वर्षांत विकसित आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले आहेत. प्रभाग क्रमांक 32 देखील याबाबतीत आघाडीवर आहे. या प्रभागात सध्या भाजप आणि शिवसेनेचे प्राबल्य आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील याच दोन पक्षांत ‘काटे की टक्कर‘ पाहायला मिळेल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 32 च्या सद्यस्थितीवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.

नवी मुंबई महापालिका वॉर्ड 32 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग रचना आणि आरक्षणाचे स्वरूप कसे असेल?

नवी मुंबई महापालिकेचे एकूण प्रभाग 41 असणार आहेत. येथील दोन पॅनलच्या प्रभागांची संख्या 01 आणि तीन पॅनलच्या प्रभागांची संख्या 40 असणार आहे. एकूण 122 पैकी अनुसूचित जातीसाठी 11 जागा, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 02 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 109 जागा आरक्षित आहेत.

नवी मुंबई महापालिका वॉर्ड 32 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 32 ची लोकसंख्या

पालिकेच्या प्रभाग क्रमांक 32 मध्ये शिरवणे गाव तसेच एमआयडीसीचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलीकडच्या जाहीर केल्या नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 32 ची एकूण लोकसंख्या 31544 इतकी आहे. यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील मतदारांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे मतदार संघातील संमिश्र लोकसंख्येचा विचार करून राजकीय पक्षांना आपले उमेदवार निश्चित करावे लागणार आहेत. लोकसंख्येचे गणित डोक्यात ठेवून जो पक्ष योग्य उमेदवार निवड करेल, त्या पक्षाचा विजय सुकर मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा

नवी मुंबई महापालिका वॉर्ड 32 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 32 मध्ये समाविष्ट प्रमुख विभाग

प्रभाग क्रमांक 32 मध्ये शिरवणे गाव जीईएस, सेक्टर 1, एमआयडीसी ब्लॉक डी, शिवाजी नगर, महात्मा गांधी नगर या प्रमुख विभागांचा समावेश होतो.

2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील चित्र

पालिकेच्या प्रभाग क्रमांक 32 मध्ये 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे प्रशांत पाटील यांनी विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेपुढे भाजपबरोबरच एकनाथ शिंदे गटाचे आव्हान आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वोट बँकेला सुरुंग लागण्याची दाट शक्यता आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.