PCMC Election 2022 Ward 31 : भाजपचा प्रभाव कायम राहणार कि विरोधक सुरुंग लावणार?

पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 31 मधील लढत देखील फार रंगतदार होणार आहे. भाजपचा मतदारांवरील प्रभाव कायम राहतोय कि विरोधक भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यात यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PCMC Election 2022 Ward 31 : भाजपचा प्रभाव कायम राहणार कि विरोधक सुरुंग लावणार?
पिंपरी-चिंचवड महापालिकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 12:24 AM

पुणे : राज्याच्या राजकारणात मुंबईइतकेच महत्त्व असलेल्या पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpari-Chinchwad Municipal Corporation)ही तितकीच महत्वाची आहे. या पालिकेची सत्ता (Power) आपल्या हाती मिळवण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. पुण्याप्रमाणेच या महापालिकेमध्ये नागरी सुविधांवर वाढत्या लोकसंख्येचा भार वाढतो आहे. त्यामुळे इथले प्रश्न कोण सोडवणार, याचे गणित लक्षात घेऊन मतदार (Voter) आपला कौल देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्ष त्यांनी याआधी केलेल्या विकासकामांची यादीच घेऊन मतदारांपुढे जाणार आहेत. पालिकेवर सध्या भाजपची सत्ता होती. महापौर माई ढोरे यांनी सत्तेची सूत्रे यशस्वीरीत्या सांभाळली आहेत. या पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 31 मधील लढत देखील फार रंगतदार होणार आहे. भाजपचा मतदारांवरील प्रभाव कायम राहतोय कि विरोधक भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यात यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच अनुषंगाने या मतदारसंघाची रचना आणि राजकीय परिस्थितीचा आढावा येथे घेत आहोत.

पिंपरी-चिंचवड महापालिका वॉर्ड 31 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

वॉर्ड क्रमांक 31 ची (काळेवाडी-विजयनगर-नढेनगर) लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 39068 अनुसूचित जाती – 4453 अनुसूचित जमाती .- 450

वॉर्डमध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश होतो?

हे सुद्धा वाचा

राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, किर्ती नगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डेनगर, विद्यानगर भाग, ऊरो रुग्णालय आदी विभागांचा वॉर्ड क्रमांक 31 मध्ये समावेश होतो. वॉर्डच्या उत्तर आणि पूर्व दिशेला पवना नदी आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका वॉर्ड 31 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

2017 च्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार

वॉर्ड क्रमांक 31 मध्ये मागील अर्थात 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत चारपैकी तीन नगरसेवक भाजपचे निवडून आले होते, तर एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारून महापालिकेत एंट्री मिळवली होती. कांबळे अंबरानाथ चंद्रकांत(भाजप), राजापुरे माधवी राजेंद्र(भाजप), चौगुले सीमा दत्तात्रय(भाजप), जगताप नवनाथ दत्तू (अपक्ष) या उमेदवारांनी विजय मिळवला होता. त्यामुळेच हा वॉर्ड भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.

पिंपरी-चिंचवड महापालिका वॉर्ड 31 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

आरक्षण कुठे काय?

महापालिकेची यंदाची निवडणूक तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार आहे. त्यानुसार अलिकडेच या वॉर्डची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. त्यानुसार 1. महिला, 2. महिला, 3. खुला असे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. काही रणांगणाबाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे याआधी प्रतिस्पर्ध्याविरोधात दंड थोपटणारे कोणती व्यूहरचना आखून आपली सरशी सिद्ध करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.