Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election 2022, Ward 32 : शिंदे गट-भाजपची युती राष्ट्रवादीचा गड भेदणार का? जाणून घ्या सध्याची स्थिती

यंदा तीन पॅनल पद्धतीने निवडणूक होणार असून 24 प्रभागांमध्ये दोन महिला उमेदवारांचे आरक्षण असणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता प्रभाग क्रमांक 32 ची निवडणूक ठाण्यासह संपूर्ण राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणार आहे.

TMC Election 2022, Ward 32 : शिंदे गट-भाजपची युती राष्ट्रवादीचा गड भेदणार का? जाणून घ्या सध्याची स्थिती
ठाणे महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 6:00 AM

ठाणे : जिल्ह्याला पहिल्यांदाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रुपात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. मोठी राजकीय उलथापालथ घडून हा सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे यंदाची ठाणे महापालिकेची निवडणूक (Thane Municipal Corporation Election) अटीतटीची होणार आहे. पालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेने (Shivsena)ने बहुमत मिळवून पालिकेवर आपला भगवा फडकावला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवल्या होत्या. त्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे मूळ शिवसेनेसोबतच होते. आता त्यांनी बंड पुकारले आहे. त्यामुळे त्यांचा शिंदे गट आणि भाजप यांच्याशी टक्कर देताना प्रतिस्पर्ध्यांसमोर तगडे आव्हान उभे राहून यावेळच्या पालिका निवडणुकीतील चित्र बदललेले दिसणार आहे. यातून प्रभाग क्रमांक 32 मधील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसतो की काय? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागणार आहे.

ठाणे महापालिका वॉर्ड 32 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभागामध्ये कोणत्या विभागांचा समावेश ?

प्रभाग क्रमांक 32 हा मफतलाल कंपनी, शिवाजी नगर या नावाने ओळखला जातो. या प्रभागामध्ये मफतलाल कंपनी, न्यू शिवाजी नगर, वाघोबा नगर, भास्कर नगर आदी प्रमुख विभागांचा समावेश होतो.

मागील निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक

32 अ – फरझान शेख (राष्ट्रवादी) 32 ब – अश्रीन राऊत (राष्ट्रवादी) 32 क – अश्रफ पठाण (राष्ट्रवादी) 32 ड – मेराज नईम खान (राष्ट्रवादी)

हे सुद्धा वाचा

ठाणे महापालिका वॉर्ड 32 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

प्रभाग क्रमांक 32 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 43108 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 4039 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 560

2017च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरचे महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना – 67 राष्ट्रवादी – 34 भाजप – 23 काँग्रेस – 3 एमआयएम – 2 अपक्ष – 2

ठाणे महापालिका वॉर्ड 32 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

पालिकेच्या निवडणुकीसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार 47 पैकी 24 प्रभागांमध्ये महिलाराज येणार आहे. पालिकेचे पूर्वी 33 प्रभाग होते, ते आता 47 झाले आहेत. यंदा तीन पॅनल पद्धतीने निवडणूक होणार असून 24 प्रभागांमध्ये दोन महिला उमेदवारांचे आरक्षण असणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता प्रभाग क्रमांक 32 ची निवडणूक ठाण्यासह संपूर्ण राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणार आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीवर राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाचा मोठा प्रभाव पडल्याचे दिसणार आहे. केंद्र सरकारमध्ये आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचा वरचष्मा आहे. यापाठोपाठ महापालिका निवडणुकांमध्ये आपला दबदबा राखण्याचे जोरदार प्रयत्न भाजपने सुरु केले आहेत. त्याचा विचार करता सध्या पालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप थेट पहिल्या क्रमांकावर मजल मारून ठाण्यातील सत्तेची स्वप्नपूर्ती करतो का, ते पाहावे लागेल.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.