Uddhav Thackeray : वाईल्ड वाईल्ड थिअरी, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेच? काँग्रेस-राष्ट्रवादी चेकमेट?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे उद्धव ठाकरेच होते? काँग्रेस राष्ट्रवादीला चेकमेट करण्याचा हा डाव उद्धव ठाकरेंनी आखला होता का?

Uddhav Thackeray : वाईल्ड वाईल्ड थिअरी, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेच? काँग्रेस-राष्ट्रवादी चेकमेट?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 1:47 PM

मुंबई : बंड शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde News) केलं. शिवसेनेसोबत अपक्ष आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे रातोरात सूरतमध्ये पोहोचले. तिथून मग आसामलाही गेले. आता जवळपास विधानसभा (Maharashtra legistative assembly) बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचं सूचक ट्वीट संजय राऊतांनी केलं. या सगळ्यात घडामोडींचा मास्टरमाईंड कोण होता? एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे उद्धव ठाकरेच होते? काँग्रेस राष्ट्रवादीला (Congress And NCP) चेकमेट करण्याचा हा डाव उद्धव ठाकरेंनी आखला होता का? अशी शंकाही आता घेतली जातेय. ही शंका घेताना गेल्या दोन दिवसांत नव्हे तर गेल्या अडीच वर्षात घडलेल्या महाविकास आघाडीतील घटनांचाही धांडोळा घेणं तितकंच गरजेचं आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड, हा एक पूर्वनियोजित राजकीय कट होता का? एकनाथ शिंदे असं पाऊल उचलणार आहेत, याबाबत उद्धव ठाकरेंना काहीच माहीत नसेल, अशी शक्यता कमीच आहे. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसला याची कूणकूण लागलेली असतानाही त्यांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला की त्यांनाही शिवसेनेचा कट मान्य होता, असाही तर्क लढवला जातोय. या वेगवेगळ्या तर्कांमागे महत्त्वाची आठ कारणं आहेत. या आठ कारणांची आणि त्यांच्या संदर्भांचा विचारही आजच्या राजकीय गोंधळात महत्त्वपूर्ण मानला जातोय.

  1. काँग्रेस-राष्ट्रवादीचा पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न : शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार चालवणं डोईजड होत होतं. उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये मुख्यमंत्री असूनही कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि वाटाघाटी वाढत गेल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा पिच्छा सोडवण्यासाठी हा कट रचला गेला असावा, ही सगळी राजकीय खेळी रचली गेली असावी, अशी शंका राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
  2. भाजपनं वाढवलेला दबाव : नुकत्याच झालेल्या विधानपरिषदा निवडुका, त्याआधी झालेल्या राज्यसभा निवडणुका, त्याच्याआधी झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपने दाखवलेली आपली ताकद, शिवाय सहा राज्यात भाजपने दाखवलेला आपला दबदबा, याचा वाढता दबाव शिवसेनेवर अजिबात नव्हता, असं म्हणणंही चूक ठरेल. भाजपची वाढती ताकद येत्या काळात शिवसेनेला मोठं चॅलेंज ठरेल, अशी होती. त्यात विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या मतांनी महाविकास आघाडीच्या पोटात गोळाच आणला होता. अशा राजकीय खेळीत भाजपला वाढलेली मतं, ही सरकारला मोठी चपराकच होती. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील चक्रव्हूहाचा आढावा घेतला तर, भाजपचा दबाव वाढत असल्याचंच दिसून येत होतं.
  3. हे सुद्धा वाचा
  4. शिवसेना नेत्यांचा दबाव : हिंदुत्वाचा मुद्दा असेल, किंवा मग केंद्रीय यंत्रणांची कारवाई, तिन्ही पक्षांसोबत तडजोडी करण्याचा प्रश्न असेल किंवा मग मूळ अस्तित्त्वाचा मुद्दा, शिवसेनेच्या नेत्यांमधील खदखद वाढत चालली होती. तिचा उद्रेक कधी ना कधी होईल, याची कूणकूण सगळ्यांना होतीच. अखेर झालंही तेच. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जी बंडाळी समोर आली, त्या बंडाळी मागे मोठा राजकीय हात आहे, असं कुठं दाखवायचं नाही आणि समोरील प्रस्नही सोडवायचे, यासाठी शक्कल तर लढवावी लागणारच होती.
  5. सरकारची अडीच वर्ष झाली : महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाली आहेत. अडीच वर्षांच्या काळात भाजपच्या नेत्यांनी अनेकदा सरकार आज पडेल, उद्या पडेल, असे अंदाज वर्तवले होते. या अडीच वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील कलह देखील सातत्यानं समोर आला. काँग्रेस आणि शिवसेनेतील वादाचीही चर्चा झाली. तीन वेगवेगळे विचारसरणी पक्ष एकत्र येऊन राज्यात सरकार चालवणं, ही तारेवरची कसरच होती. कधी शरद पवारांची शिष्टाई, तर कधी उद्धव ठाकरेंची समजून, असे दिवस काढत काढत सरकारने अडीच वर्ष पूर्ण केली खरी. या अडीच वर्षात सरकारवर अनेक हल्लेही झाले. अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, प्रताप सरनाई, भावना गवळी, अर्जुन खोतकर, खुद्द उद्धव ठाकरेंचे नातलग, यासोबतच वेळोवेळी सरकारची भूमिका मांडणारे संजय राऊत यांनाही अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. पण दिवसेंदिवस हा वाद वाढत चालला होता, हेही दिसून येत होतं. आणखी अडीच वर्ष याच तणावात सरकार चालवायचं की नाही? असा प्रश्नही उपस्थित केला गेला नसेल, तरच नवल.
  6. उत्तर प्रदेशनंतर भाजपचं वाढलेलं प्रस्थ : सहा राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात उत्तर प्रदेशची निवडणूक अत्यंत मोलाची होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपनं एकहाती दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचा सुपडा साफ झाला. उत्तर प्रदेश सोबत गोव्यातही भाजपने दणदणित बाजी मारली होती. यामुळे भाजपचं प्रस्थ वाढतंय, हे विधानसभा निकालातून स्पष्ट झालेलं होतं. तसंच गुजरातच्या निवडणुका या वर्षाच्या शेवटी होऊ घातलेल्या आहेत. शिवाय महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं विजयी गुलाल उधळला होता.
  7. राज्यसभेसह इतर निवडणुकीत झालेला पराभव : राज्यसभा निवडणुकीतील पराभव महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागणारा होता. शिवसेनेचे संजय पवार पडले. खरंतर यातही संजय राऊतांचा पराभव करायचा होता, असं सांगितलं जातं. पण एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आणि त्यामुळे संजय राऊत निवडून आले. पण संजय पवारांना वाचवण्यात यश आलं नाही. राज्यसभेचा निकालानं फुटलेल्या मतांना मुद्दा चर्चेत येऊ लागला होता.
  8. पवारांचा बेभरवसा : शरद पवार आणि बेभरवसा, हे शब्द पवारांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत नेहमीच वापरले जातात. हीच बात अडीच वर्षांच्या सरकारने आणखी जवळून अनुभवली असेल. शरद पवारांची बेभरवशाचं राजकारण कधीही दगाफटका करु शकतं, अशी भीती शिवसेनेच्या आमदारांना नेहमी लागून राहिलेली होती, असंही सांगितलं जातं.
  9. अजित पवारांची भाजपशी जवळीक : पहाटेचा शपथविधी असो किंवा मग पत्रकार परिषदांमध्ये पहाटेच्या शपथविधीवर विचारण्यात आलेले प्रश्न असोत, अजित पवारांची भाजपशी असलेली जवळीत लपून राहिलेली नाही. प्रशासकीय वचक ही अजित पवारांची एक खुबी असली, तरिही त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेल्या नाहीत. राज्याचं उपमुख्यमंत्री दिलेल्या अजित पवारांकडे जवळपास राज्याची सूत्र आहेत की काय, अशी कुजबूज शिवसेना आमदारांमध्येही सुरु झाली होती, असंही सांगितलं होतं.

वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : महाविकास आघाडी विधानसभा बरखास्तीची शिफारस करणार

2019 मध्ये शिवसेनेचा कुठून कोणता आमदार निवडून आला होता? वाचा

एकूण 56शिवसेना आमदार मतदारसंघ
1एकनाथ शिंदेकोपरी-पाचपाखाडी
2गुलाबराव पाटीलजळगाव ग्रामीण
3चिमणराव पाटीलएरंडोल
4किशोर पाटीलपाचोरा
5संजय गायकवाड बुलडाणा
6संजय रायमुलकरमेहेकर
7नितीनकुमार तळेबाळापूर
8संजय राठोडदिग्रस
9बालाजी कल्याणकरनांदेड उत्तर
10संतोष बांगरकळमनुरी
11राहुल पाटीलपरभणी
12अब्दुल सत्तारसिल्लोड
13प्रदीप जैसवाल औरंगाबाद मध्य
14संजय शिरसाठऔरंगाबाद पश्चिम
15संदीपान भुमरेपैठण
16रमेश बोरनारे वैजापूर
17सुहास कांदेनांदगाव
18दादा भुसेमालेगाव बाह्य
19श्रीनिवास वनगापालघर
20शांताराम मोरेभिवंडी ग्रामीण
21विश्वनाथ भोईरकल्याण पश्चिम
22बालाजी किणीकरअंबरनाथ
23लताबाई सोनावणेचोपडा
24प्रकाश सुर्वेमागाठणे
25प्रताप सरनाईकमाजीवडा
26सुनील राऊतविक्रोळ
27रमेश कोरगांवकरभांडुप पश्चिम
28रविंद्र वायकरजोगेश्वरी पूर्व
29सुनील प्रभूदिंडोशी
30दिवंगत रमेश लटकेअंधेरी पूर्व
31दिलीप लांडेचांदिवली
32प्रकाश फातर्पेकरचेंबुर
33मंगेश कुडाळकरकुर्ला
34संजय पोतनीसकलिना
35सदा सरवणकरमाहिम
36आदित्य ठाकरेवरळी
37अजय चौधरीशिवडी
38यामिनी जाधवभायखळा
39महेंद्र थोरवेकर्जत
40महेंद्र दळवीअलिबाग
41भरत गोगावलेमहाड
42ज्ञानराज चौगुलेउमरगा
43कैलास पाटीलउस्मानाबाद
44तानाजी सावंतपरांडा
45शाहजी बापू पाटीलसांगोला
46शंभूराजे देसाईपाटण
47योगेश कदमदापोली
48भास्कर जाधवगुहागर
49उदय सामंतरत्नागिरी
50राजन साळवीराजापूर
51वैभव नाईककुडाळ
52दीपक केसरकरसावंतवाडी
53प्रकाश आबीटकरराधानगरी
54अनिल बाबरखानापूर
55सुजित मिंचेकरहातकणंगले
56उद्धव ठाकरेविधान परिषद आमदार
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.