Maharashtra Panchayat election Results 2022 LIVE : जळगावात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का
Maharashtra Panchayat election Results 2022 LIVE Updates in Marathi आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आपण आज ग्रामपंचायत निवडणूक निकालाबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत.
मुंबई : आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आपण आज ग्रामपंचायत निवडणूक निकालाबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 36, धुळे 41, जळगाव 20, अहमदनगर 13, पुणे 17, सोलापूर 25, सातारा 7, सांगली 1, औरंगाबाद 16, बीड 13, परभणी 2, उस्मानाबाद 9, जालना 27, लातूर 6 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 अशा एकूण 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकांसाठी सरासरी 78 टक्के एवढे मतदान झाले होते.