Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात माईंड गेम! केसरकर म्हणतात मी साईभक्त, श्रद्धा-सबुरी दोन्ही सोबत
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : टीव्ही 9 मराठीशी फोनवरुन बातचीत करताना त्यांनी सविस्तर भूमिका मांडलीय.
मुंबई : बंडखोर शिवसेना आमदारांना (Rebel Shiv sena MLA Eknath Shinde Group) आता माईंग गेमला सामोरं जावं लागतंय. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बंडखोरांना काय निर्णय घ्यायचा तो आधी घेऊ द्या, असं म्हटलं. त्यानंतर बंडखोर आमदारांना शिंदे गट काय पावलं उचलतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंय. अशातच दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. आमचा संयम सुटावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे, असं केरकरांनी म्हटलंय. टीव्ही 9 मराठीशी फोनवरुन बातचीत करताना त्यांनी सविस्तर भूमिका मांडलीय. कुणाचा संयम आधी सुटतो, यावर अनेक राजकीय डावपेच आता आखले जाणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे मी साईभक्त आहे. श्रद्धा आणि सबुरी दोन्ही आमच्यासोबत आहे, असं म्हणत संयम सुटू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
नेमकं काय म्हटलं केसरकरांनी?
आमदारांना निलंबित करणं, हे कुठेही टिकणार नाही, आमचा संयम तुटावा, यासाठी या सगळ्या टॅकटिक्स आहेत, असं केसरकर म्हणाले. शिंदे साहेबांनी अख्ख आयुष्य वेचलंय शिवसेनेसाठी. त्यांनीही संयम राखायला सांगितलाय. कुणाचा संयम अगोदर सुटेल, हे आधी पाहिलं जातं राजकारणात. मी स्वतः साईबाबांचा भक्त आहे…श्रद्धा आमची पक्षावर आहे आणि सबुरीही आमच्याकडे आहे. आम्ही संयम पाळू.. आम्ही संयम सोडणार नाही, जिंकून दाखवू, असं विधान केसरकर यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना केलं.
पाहा व्हिडीओ :
आज पुन्हा शिंदे गटाची बैठक
आज दुपारी पुन्हा एकदा शिंदे गटाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. एकनाथ शिंदे गटाच्या दररोजच बैठका होत असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. कायदेशीर बाबी तपासून पाहण्यासाठी शिंदे गटातील आमदारांच्या बैठका आणि चर्चा होत आहेत. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि आमच्या विरोधात शिवसैनिकांची माथी भडकवली जात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
शिंदे गट कोर्टात जाणार
दरम्यान, 16 आमदारांच्या निलंबनासाठीच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी फक्त दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. ही मुदत उद्या संपतेय. त्या पार्श्वभूमीवर किमान सात दिवसांच्या कार्यालयीन कामदारांच्या वेळेइतकी मुदत मिळायला हवी होती, असं केसरकरांनी म्हटलंय. या निलंबनाविरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शिवसेनेनं सुरुवातीस 12 आमदारांच्या निलंबानाची मागणी केली होती. त्यानंतर त्यात आणखी चार आमदारांची नाव वाढवण्यात आलेली. आता हे संपूर्ण प्रकरण कोर्टात जाण्याची दाट शक्यता निर्माण झालीये.
वाचा एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live