उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली? निकाल कुठे झुकतोय? तज्ज्ञ काय सांगतात?

सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल एप्रिल अखेरपर्यंत लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली? निकाल कुठे झुकतोय? तज्ज्ञ काय सांगतात?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 11:41 AM

मुंबई : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष (Maharashtra political crisis) अंतिम टप्प्यावर असतानाच ठाकरे (Thackeray) गटाला सेटबॅक देणारी बातमी आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme court) ठाकरे गटाची महत्त्वाची मागणी फेटाळून लावली, असंच सध्याचं चित्र आहे.. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठाऐवजी सात सदस्यीय घटनापीठाकडे द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने सध्या तरी ही मागणी फेटाळली आहे. हा खटला पाच सदस्यीय घटनापीठासमोरच सादर होईल. मंगळवारपासून सुनावणीला पुन्हा सुरुवात होईल. मंगळवारनंतर होणाऱ्या युक्तिवादातून हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे द्यायचं का, यासंबंधीचा निर्णय दिला जाईल, असे म्हटले जात आहे.  शिंदे गटासाठी हा दिलासादायक निर्णय असल्याचं म्हटलं जातंय.

सध्या कुणाचं पारडं जड?

सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची मागणी नाकारल्यानंतर सध्या एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांचं पारडं जड असल्याचं वक्तव्य अॅड. सिद्धार्थ शिंदे केलंय. त्यामुळे या घटनाक्रमावर ठाकरे गटाकडून अधिक तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते.

उल्हास बापट काय काय म्हणाले?

आतापर्यंत नबाम रेबिया आणि किहोटो खटले महाराष्ट्रात लागू होतात की नाही, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कुठपर्यंत मर्यादित आहेत, यासंबंधीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद झाला. मंगळवारनंतर पक्ष सोडला याचा अर्थ काय.. दोन तृतीयांश लोक एकाच वेळी पक्ष सोडू शकतात की हळू हळू सोडता येतो, पक्षातून बाहेर पडलेल्यांना विलीनीकरण अनिवार्य आहे का..

सभापतींचे अधिकार- अविश्वासा ठरावाचा परिणाम, राज्यपालांचे अधिकार नेमके काय आहेत की ही नाममात्र पोस्ट आहे. राज्यपालांनी काही बाबतीत- मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करायचं का, अशा मुद्द्यांवर युक्तिवाद होईल, असे उल्हास बापट म्हणाले.

अंतिम निर्णय कधी?

सुप्रीम कोर्टासमोरील सुनावणी मंगळवारपासून सुरु होणार आहे. काही मुद्द्यांवर विसंवाद आहेत. तसेच घटनापीठातील दोन न्यायमूर्ती पुढील दोन महिन्यात निवृत्त होणार आहेत. तसेच 15 मे पासून कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्या असतात. त्यामुळे सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल एप्रिल अखेरपर्यंत लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निकाल महाराष्ट्रासाठी बंधनकारक

मंगळवारपासून सुरु होणारी सुनावणी ही पाच सदस्यीय घटनापीठासमोर केली जाईल. ठाकरे गटाची मागणी मान्य करून हा खटला सात सदस्यीय घटनापीठासमोर मांडला गेला असता तर खटल्याचा निकाल संपूर्ण देशासाठी लागू झाला असता. मात्र पाच सदस्यीय घटनापीठाचा निकाल यापुढे फक्त महाराष्ट्रासाठी बंधनकारक असेल, अशी माहिती उल्हास बापट यांनी दिली.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.