प्रतापराव चिखलीकर आणि मी काही दुश्मन नाही : अजित पवार
भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट (MLA prataprao chikhalikar Meet ajit pawar) घेतली.
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगाने घडत आहेत. त्याच धामधुमीत भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट (MLA prataprao chikhalikar Meet ajit pawar) घेतली. अजित पवारांच्या मुंबईतील प्रेम कोर्ट या निवासस्थानी ही भेट झाली. अजित पवार आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यात जवळपास तासभर चर्चा (MLA prataprao chikhalikar Meet ajit pawar) झाली.
या भेटीनंतर अजित पवारांची माध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी अजित पवार (MLA prataprao chikhalikar Meet ajit pawar) म्हणाले, “आमच्या भेटीत काही राजकीय अर्थ नाही. ते माझे चांगले मित्र आहे. त्यामुळे ते भेटायला आले होते. ते भाजपमध्ये आहे आणि मी राष्ट्रवादीत. त्यामुळे उगाच गैरसमज करु नका.”
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलेला 170 चा आकडा नक्कीच गाठला जाईल. काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यांचे अध्यक्ष पदासाठी नाव आलं असेल. त्याचा अर्ज आज भरला जाईल,” असेही अजित पवार म्हणाले. “मला जी जबाबदारी पक्ष देईल, ती जबाबदारी मी स्वीकारणार,” असेही अजित पवार म्हणाले.
“आमच्या भेटीत काहीही राजकीय अर्थ नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते भेटायला आले होते. ते भाजपमध्ये आहेत आणि मी राष्ट्रवादीत आहे.” असेही त्यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट (MLA prataprao chikhalikar Meet ajit pawar) केले.
“प्रतापराव चिखलीकर यांना मला कालच भेटायचं होतं. पण काल भेटणं शक्य झाले नाही. त्यामुळे मी त्यांना आज सकाळी लवकर या असे सांगितले. त्यानुसार आमची ही भेट झाली. अनेक लोक वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटत असतात, त्यामुळे गैरसमज करुन घेऊ नका”, असेही ते (MLA prataprao chikhalikar Meet ajit pawar) म्हणाले.
खासदार प्रतापराव चिखलीकर आणि अजित पवारांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. खासदार चिखलीकर हे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा चिखलीकर यांनी पराभव केला होता. मात्र राज्यमंत्रिपदावर वर्णी न लागल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश (MLA prataprao chikhalikar Meet ajit pawar) केला.
दरम्यान दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रतापराव चिखलीकरांची ओळख आहे.