80व्या वर्षीही शरद पवार फूलफॉर्मात, प्रीती संगमावर आले, लोकांच्या गराड्यात येऊन थेट भाजपलाच ललकारले

Sharad pawar ncp : महाराष्ट्रात काल पुन्हा लोकांना राजकीय भूकंप पाहायला मिळाला. राष्ट्रवादी पक्षातील एक गट फुटून सध्याच्या सरकारमध्ये समाविष्ठ झाला. त्यानंतर शरद पवारांनी त्यांना समर्थन नसल्याचं जाहीर केलं होतं. आज कराडमध्ये शरद पवारांनी त्यांची भूमिका मांडली.

80व्या वर्षीही शरद पवार फूलफॉर्मात, प्रीती संगमावर आले, लोकांच्या गराड्यात येऊन थेट भाजपलाच ललकारले
sharad patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 3:00 PM

कराड : महाराष्ट्रात (maharashtra politics crisis) राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत अनेक दिवसांपूर्वी अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिले होते. त्यावेळी अनेकांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. मागच्या महिनाभरापूर्वी शरद पवारांनी (sharad pawar) सुध्दा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुध्दा राजकीय वातावरणं चांगलचं तापलं होतं. काल अचानक राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर शरद पवारांनी माझं या गोष्टीला समर्थन नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर शरद पवार काय बोलतात, याकडे राज्यातल्या देशातल्या नेत्याचं लक्ष लागलं होत. काही वेळापूर्वी पवारांनी यशवंतराव चव्हाण (karad yashwantrao chavan) यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्यानंतर प्रीती संगमावरून भाजपवर जोरदार हल्ला केला.

‘भाजपने गेल्यावर्षी शिवसेना फोडली. त्यानंतर काल राष्ट्रवादीचा एक मोठा गट फोडला आहे. अजितपवारांनी भाजपशी हातमिळवणी करुन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे मोठे नेते फुटून गेल्याने राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ज्यावेळी शरद पवार कराडमध्ये पोहोचले, त्यावेळी तिथं पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, इत्यादी नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

“भाजपचं सरकार सध्या देशासह महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने मागच्या कित्येक महिन्यांपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. सध्या जी समादविघातक जी काही प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात आज सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे. त्याचं पद्धतीचं काम आपण महाराष्ट्रात करीत होतो. पण सध्या एकोप्यानं राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.” असं पवारांनी सांगितलं.

“महाराष्ट्रातील सरकार या ना त्या कारणाने काही लोकं उलथवून टाकण्याचं काम केलं जात आहे. हे फक्त महाराष्ट्रातचं नाही, तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये केलं आहे. चुकीच्या प्रवृत्ती सध्या डोकं वरती काढत आहेत. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्रात आहे. सध्याच्या प्रवृत्ती विरोधात महाराष्ट्रातील शक्ती नक्की उभी राहिलं. त्याचबरोबर त्यांनी त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही” अशी टीका पवारांनी भाजपवर गेली.

आज गुरु पोर्णिमा आहे, त्यामुळे आजच्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावरुन अपप्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची सुरुवात करुया असं पवार म्हणाले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.