‘मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली…’, चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत, पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राजकीय घडामोडी घडत असल्यामुळे देशातील सगळ्या लोकांचं महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : मागच्या रविवार पासून महाराष्ट्रात राजकीय चर्चेला (maharashtra politics crisis) उधान आलं आहे. राष्ट्रवादीचा एक गट फुटून भाजपमध्ये सत्तेत गेल्यापासून राजकीय घडामोडी वाढल्या आहे. मुंबई आणि दिल्लीत बैठका सुरु आहेत. मागच्यावर्षी शिवसेनेचा एक गट फुटून भाजपमध्ये (bjp) सामील झाला होता. त्याला एक वर्षे झाल्यानंतर दुसरा गट सत्तेत दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) निराश असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याची सुध्दा चर्चा सुरु आहे. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे.
मला मागच्या काही दिवसांपासून सतत कॉल येत आहेत. 2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते आणि माझा पराभव झाला. ‘मी मागच्या चार वर्षापासून नाराज आहे, त्याचबरोबर पक्ष सोडून जाणार आहे अशा चर्चा सुरु आहेत. काँग्रेसचे नेते सुध्दा म्हणत आहेत की, पंकजा मुंडे आल्या तर येऊ द्या, हे सगळं कोण पसरवत आहे ?’ या सगळ्या अफवा आहेत असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं.
माझ करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा आहे. मी गेली 20 वर्ष राजकारणात काम करीत आहे. त्याचबरोबर माझ्याबाबत मुद्दाम चर्चा घडवून आणल्या जात आहेत. पंकजा मुंडे पात्र की अपात्र हे पक्ष ठरवेल मी कसं सांगू असंही त्या म्हणाल्या.
“माझ्यावर अनेक आरोप झाले आहेत, मला पराभव पत्करावा लागला आहे. मी ईश्वर साक्ष आज शपथ घेते की, मी कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षाला माझ्या पक्ष प्रवेशासाठी कधीही भेटलेले नाही. मी माझ्या आयुष्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले सुध्दा नाही.” असंही त्यांनी सांगितलं.
मी याच्याआगोदर सुध्दा म्हणाले होते की, राजकारणात जर चुकीची गोष्ट करावी लागली, तर मी राजकारण सोडेन. मी दोन महिन्यांची सुट्टी घेत आहे. मला अंतर्मुख व्हायची गरज आहे असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.