KDCC Bank Election | पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही, राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फसवणूक केली आहे, असा थेट आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही, असा इशाराही शेट्टींनी दिला.

KDCC Bank Election | पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही, राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा
राजू शेट्टी, सतेज पाटील
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 9:30 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत (Kolhapur District Central Co-operative Bank Election – KDCC) आघाडीवरुन बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनाही (Swabhimani Shetkari Sanghatana) सवतासुभा मांडण्याच्या तयारीत “आहे. आयत्या वेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, आता तो खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही” असा इशाराच स्वाभिमानीने काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना दिला आहे.

सतेज पाटलांनी फसवणूक केल्याचा आरोप

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. स्वाभिमानीला एक जागा देतो, असं आश्वासन सतेज पाटील यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करताना दिलं होतं. आता शिरोळची जागा बिनविरोध करण्यासाठी त्यांनी स्वीकृतचा पर्याय दिला आहे. सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फसवणूक केली आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सतेज पाटील यांच्यावर केला आहे. आयत्या वेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, आता तो खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही, असा इशारा शेट्टींनी सतेज पाटील यांना दिला आहे.

बँक संचालकपदी निवडीचा मार्ग मोकळा

कोल्हापूर विधान परिषद मतदारसंघातून आमदारपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही सतेज पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी गगनबावडा विकास सेवा संस्था गटातून अर्ज दाखल केला. या गटातून विरोधी आघाडीने अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडणूक निवडीचा मार्ग मोकळा झाला.

सतेज पाटील विधान परिषदेवरही बिनविरोध

कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेवर सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. महत्त्वाची बाब म्हणजे अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्लीवरुन फोन आल्यानं बोललं जात होतं.

संबंधित बातम्या :

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध, अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज मागे

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.