Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : विजय वडेट्टीवार म्हणाले, आमचं चुकलचं; आता अपक्षांना झुकतं माप कशाला देणार?

जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या समर्थकांनी राहुल भाऊ आगे बढोच्या घोषणा दिल्या. दरम्यान, मंत्री महोदयांसमोरच ह्या अंतर्गत गटबाजीचे दर्शन त्या कार्यकर्त्यांनी घडवले. यातीलच एका कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाचा विजय असो, अशी घोषणा ही दिलीय.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : विजय वडेट्टीवार म्हणाले, आमचं चुकलचं; आता अपक्षांना झुकतं माप कशाला देणार?
पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 12:45 PM

बुलडाणा : राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी शब्द देऊनदेखील काहींनी मतदान केले नाही. त्यांना आम्ही विकासकामांसाठी भरपूर निधी दिला. मात्र ऐनवेळी त्यांनी दगा दिला. त्यामुळे आता अपक्षांना झुकते माप कशाला देऊ, आता समान निधी द्यावा लागेल, असे वादग्रस्त विधान (Controversial Statement) राज्याचे आपत्ती निवारण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. बुलडाणा (Buldana) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय. मंत्री विजय वडेट्टीवार काल बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ओबीसी मेळाव्याला (OBC Meeting) संबोधित केल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, रणनीतीची अंमलबजावणी करण्यात आम्ही कमी पडलो. आमची चूक झाली. आमची दोन मते ईडीने खाल्ली. एक मत बाद करण्यात आले. ज्या अपक्ष आमदारांनी आम्हाला शब्द दिला होता वेळेवर काहींनी विश्वासघात केला.

पाहा व्हिडीओ काय म्हणाले, विजय वडेट्टीवार

मंत्री वडेट्टीवारांसमोरच भाजप विजयाच्या घोषणा

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी संघर्ष मेळाव्याच्या निमित्ताने बुलडाणा दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासमोरच काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उघड झाली. त्यांच्या समोरच काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो, अशा घोषणा लावल्या. बुलडाणा शहरातील गर्दे हॉल येथे मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी विजय वडेट्टीवार आले होते. कार्यकर्त्यांनी त्यांचं ढोल-ताशा फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केलं. गेटवरच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थकांनी बंटी भाऊ तुम आगे बढो, अशा घोषणा करतानाच दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या समर्थकांनी त्यांच्या घोषणा केल्या. तर तिसरीकडे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या समर्थकांनी राहुल भाऊ आगे बढोच्या घोषणा दिल्या. दरम्यान, मंत्री महोदयांसमोरच ह्या अंतर्गत गटबाजीचे दर्शन त्या कार्यकर्त्यांनी घडवले. यातीलच एका कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाचा विजय असो, अशी घोषणा ही दिलीय. सर्वांनी त्याला प्रतिसाद दिलाय.

हे सुद्धा वाचा

आता जास्त निधी कशाला देणार?

राज्यसभा निवडणुकीत दोन मतांनी महाविकास आघाडीचा उमेदवार पडला. या प्रकरणी अपक्ष उमेदवारांनी धोका दिला. त्यांनी धोका दिला नसता तर आमचा उमेदवार निवडून आला असता, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. अपक्षांना आम्ही जास्त निधी देत होतो. पण, त्यांच्यापैकी काहींना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मत दिलं नाही. त्यामुळं पराभव स्वीकारावा लागला असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.