मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके कोणते उपचार सुरु आहेत याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. बॉम्बे हॉस्पिटलच्या बाराव्या मजल्यावर, डॉ. गौतम भंसाळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हसन मुश्रीफ यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 127 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. आधी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला. किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं, असं मुश्रीफ म्हणाले.
VIDEO :
संबंधित बातम्या
किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार : हसन मुश्रीफ