सुमित सरनाईक, TV9 मराठी, मुंबई : महाराष्ट्र राज्य महामंडळाने (Maharashtra State Corporation) 5 हजार कंत्राटी चालकांच्या भरतीचा निर्णय रद्द केला आहे. 5 हजार चालकांची महामंडळाकडून भरती करण्यात येणार असल्याची योजना प्रस्तावित होती. मात्र ही योजना रद्द करण्यात आलीय. एसटी संपाच्या काळाचा काही कंत्राटी चालकांची (Contract basis Driver) भरती करण्यात आली होती. संप काळात करण्यात आलेल्या कंत्राटी चालकांच्या भरतीनंतरही एसटीला चालकांची (ST Drivers) कमतरता भासत होती. त्यामुळे 5 हजार एसटी चालकांच्या कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला होता.
एसटी महामंडळाच्या अनेक आगारात असमतोल मनुष्यबळ आहे. अनेकदा एसटी डेपोमध्ये गाड्या असूनही चालक नाही, अशी स्थिती होते. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात. यासाठी चालकांची कंत्राटी चालकांची भरती करण्यासाठीची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या होत्या. संप काळात भरण्यात आलेल्या काही चालकांची संख्या कमी करण्यात आली होती. तर काहींना मुदत वाढवण्यात देण्यात आली होती.
दरम्यान, याआधी भरती प्रक्रियेत निवड झालेल्या काही उमेदवारांचं प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आलं होतं. मात्र त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या उमेदवारांकडून अनेकदा विचारणाही करण्यात येत होती.मात्र कोरोना महामारी आणि एसटीचा संपाचा या संपूर्ण भरती प्रक्रियेला फटका बसला होता. ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अखेर 5 हजार कंत्राटी चालकांच्या भरतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. 5 हजार कंत्राटी चालकांच्या भरतीची योजना अखेर रद्द करण्यात आलीय.