महाराष्ट्राला अद्याप रुपयाचीही मदत नाही, संभाजीराजे मोदी सरकारवर कडाडले

राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे.

महाराष्ट्राला अद्याप रुपयाचीही मदत नाही, संभाजीराजे मोदी सरकारवर कडाडले
Follow us
| Updated on: Nov 27, 2019 | 5:34 PM

नवी दिल्ली : राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. कोल्हापूर-सांगलीचा महापूर असो किंवा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान असो, महाराष्ट्राला एक रुपयाही मिळाला नाही, अशी खंत खासदार संभाजीराजेंनी (Sambhaji Chhatrapati) व्यक्त केली. संभाजीराजेंनी राज्यसभेत आपलं निवेदन दिलं.

“महापूर आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केलेले आहे. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली. पण सरकारने अजूनही मदत दिली नाही. वेळेत पंचनामे न केल्याने केंद्र सरकारने मदत दिली नाही, असं संभाजीराजेंनी राज्यसभेत सांगितलं.

प्राथमिक अंदाजानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे 54 लाख हेक्टर सुपीक जमिनीचे नुकसान झाले. एकतर यावर्षी मान्सून एक महिना उशिरा आला. त्यात जो आला तो अतिरिक्त पाऊस घेऊन आला. कोल्हापूर, सांगली, सातारामधील बऱ्याच भागातील उभी पिके आणि घरे दारे पुरामध्ये बुडून गेली. परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील जी काही थोडीबहुत पिके उभी होती, काढणीला आली होती त्यांचं नुकसान केले, असं संभाजीराजे म्हणाले.

नुकसानभरपाईसाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे निधीची मागणी केली होती. त्यात महापूर नुकसानभरपाईकरिता 6813 कोटी आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाईकरिता 7207 कोटी रुपयांची मागणी केली होती. खेदाची बाब ही आहे की , महाराष्ट्राला त्यातील एक रुपयाही मिळाला नाही, असं संभाजीराजे म्हणाले.

गेल्या तीन महिन्यांत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ पोहोचवला गेला नाही. ‘पंचनामे’ कारण्याच्या नावाखाली सामान्य शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. मला सरकारच्या निदर्शनास ही अत्यंत संतापजनक गोष्ट आणून द्यायची आहे, असं संभाजीराजे म्हणाले.

संबंधित बातम्या  

शिवसेनेवर टीका करताना चूक, संभाजीराजेंचं रवीशंकरांना खरमरीत पत्र, तात्काळ माफीची मागणी 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.