बुलडाणा आढावा | बुलडाणाकरांचा कौल कुणाला?

बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर  यांचा समावेश आहे. 

बुलडाणा आढावा | बुलडाणाकरांचा कौल कुणाला?
Follow us
| Updated on: Aug 26, 2019 | 12:10 PM

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जगातले तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवरही बुलडाणा जिल्ह्यात आहे. संतांची भूमी म्हणूनही जिल्ह्याला तशी ओळख आहे. मात्र जिल्हा विकासापासून आजही कोसोदूर आहे. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटले तरी आजही जिल्ह्याचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. म्हणून मागासलेला जिल्हा अशी ओळख निर्माण झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर  यांचा समावेश आहे. सध्या इथे काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 2 आणि भाजपचे 3 आमदार आहेत.

सध्या  जिल्ह्यात एकूण २०२५९१७ मतदार असून त्यात  पुरुष मतदार १०६२४१८ आहेत आणि ९६३४९१ महिला मतदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी ५७.८१ टक्के मतदान झाले होते.

बुलडाणा विधानसभा 2014 मध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यामुळे काही मतदारसंघात दुहेरी लढत झाली तर काही ठिकाणी तिरंगी आणि काही ठिकाणी चौरंगी लढत पाहायला मिळाली.

बुलडाणा विधानसभा (Buldhana Vidhan Sabha)

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत हर्षवर्धन सपकाळ यांनी सलग 3 वेळा निवडून आलेले शिवसेनेचे विजयराज शिंदे यांचा पराभव केला होता.

चिखली विधानसभा (Chikhali Vidhan Sabha)

चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे प्रतिनिधीत्व करत आहेत. सलग दुसऱ्यांदा ते चिखली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपच्या सुरेशअप्पा  खबुतरे यांचा पराभव केला.

मेहकर विधानसभा (Mehkar Vidhan Sabha)

मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय रायमुलकर विद्यमान आमदार आहेत. ते दोनवेळा निवडून आले आहेत.  2014 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या लक्ष्मणराव घुमरे यांचा पराभव केला.

सिंदखेड राजा विधानसभा (Sindkhed raja vidhan sabha)

सिंदखेड राजा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र मागील वेळी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यांच्या जागी भाजपमधून आलेल्या चिखलीच्या भाजपच्या माजी आमदार रेखा खेडेकर यांना तिकीट देण्यात आलं. पण त्यांचा शिवसेनेचे उमेदवार डॉ शशिकांत खेडेकर यांनी पराभव केला.

हा मतदारसंघ सलग 4 वेळा राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. मात्र 2014 मध्ये शिवसेनेच्या खेडेकर यांनी त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या रेखा खेडकर यांचा पराभव केला.

खामगाव मतदारसंघ (Khamgaon Vidhan sabha)

भाजपचे आकाश फुंडकर हे विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये खामगाव मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. भारिपचे अशोक सोनोने , काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा आणि भाजपचे आकाश फुंडकर यांच्यात लढत झाली होती. मात्र या ठिकाणी आकाश फुंडकर हे निवडून आले. त्यांनी सलग 3 वेळा आमदार राहिलेल्या दिलीप सानंदा यांचा पराभव केला.

 जळगाव जामोद मतदारसंघ (Jalgaon Jamod Vidhan sabha)

भाजपचे डॉ संजय कुटे हे जळगाव जामोद मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. 2014 मध्ये जळगाव जामोद मतदारसंघात भाजपच्या डॉ संजय कुटे यांनी काँग्रेसच्या रामविजय बुरुंगले यांचा पराभव करून हॅट्रिक केली आणि गड कायम राखला.

मलकापूर विधानसभा (Malkapur Vidhan sabha)

भाजपचे चैनसुख संचेती हे विद्यमान आमदार आहेत. मलकापूर विधानसभा मतदारसंघात  भाजपच्या चैनसुख संचेती यांनी 4 वेळा विजयश्री खेचून आणला. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या अरविंद कोलते यांचा पराभव केला.

विधानसभा 2019 साठी इच्छुक उमेदवार 

1) बुलडाणा – 

  • काँग्रेस- विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्री शेळके, संजय राठोड, डॉ मधुसूदन सावळे
  • भाजप – डॉ योगेंद्र गोडे
  • शिवसेना – जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे
  • वंचित बहुजन आघाडी – विष्णू उबाळे , भारिप जिल्हाध्यक्ष सदानंद माळी , जितेंद्र जैन

2) चिखली – 

  • काँग्रेस – विद्यमान आमदार राहुल बोंद्रे, माजी नगराध्यक्ष सलीम मेमन
  • भाजप – माजी आमदार रेखा खेडेकर , सुरेशअप्पा खबुतरे, श्वेता महाले, विजय कोठारी, माजी आमदार धृपदराव सावळे, संजय चेके
  • शिवसेना – शिवसेना नेते नरेंद्र खेडेकर, भास्करराव मोरे

3) मेहकर – 

  • शिवसेना – विद्यमान आमदार संजय रायमुलकर
  • काँग्रेस – लक्ष्मणराव घुमरे
  • राष्ट्रवादी – अॅड साहेबराव सरदार
  • भाजप – मंदाकिनी कंकाळ, प्रकाश गवई

४) सिंदखेड राजा –

  • काँग्रेस – युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे
  • राष्ट्रवादी – डॉ राजेंद्र शिंगणे
  • भाजप – विनोद वाघ, डॉ गणेश माटे, सुनील कायंदे
  • वंचित- सविता मुंढे , डॉ नरेश बोडखे
  • शिवसेना – विद्यमान आमदार डॉ शशिकांत खेडकर .

५) खामगाव – 

  • भाजप – विद्यमान आमदार आकाश फुंडकर
  • काँग्रेस – माजी आमदार दिलीप सानंदा , तेजंद्रसिंग चव्हाण , धनंजय देशमुख
  • वंचित – प्रदेशाध्यक्ष -अशोक सोनोने , पंजाबराव देशमुख

६) जळगाव जामोद –

  • भाजप – विद्यमान आमदार डॉ संजय कुटे
  • काँग्रेस – प्रसेनजीत पाटील , स्वाती वाकेकर , रामविजय बुरंगले , ज्ञानेश्वर पाटील
  • राष्ट्रवादी – संगीतराव भोंगळ ,
  • शिवोवसेना – गजानन वाघ
  • वंचित – चेतन दिघे

७ ) मलकापूर 

  • भाजप – विद्यमान आमदार चैनसुख संचेती
  • काँग्रेस – बलदेवराव चोपडे , दिलीप देशमुख , हरीश रावळ , राजेश एकडे , अरविंद कोलते , राजू पाटील , रशीद जामदार

बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाच्या समस्या 

1) शेतीवर आधारित जिल्ह्यात एकही प्रकल्प नाही

2) खामगांव – जालना रेल्वे मार्ग प्रतिक्षेत

3) 1420 गावात कायम पाणी टंचाई

4) सिंचन अभाव

5) आरोग्य सुविधेपासून वंचित

6) शेगाव , सिंदखेडराजा , लोणार विकास आराखडा प्रलंबित

7) औद्योगिकीकरण नाही

8) बेरोजगारी

9 ) जिगव प्रकल्प प्रलंबित

10 ) उच्च शिक्षण सुविधा नाही

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.