विनोड तावडे यांच्यानंतर मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी रुपये, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?

| Updated on: Nov 20, 2024 | 9:34 AM

Maharashtra Election 2024 : ही इनोवा कार मंत्री पार्क सोसायटीच्या समोर उभी होती. यातून कोट्यवधीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचा हा उमेदवार दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. याआधी मंगळवारी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाला होता.

विनोड तावडे यांच्यानंतर मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी रुपये, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
Cash for Vote
Follow us on

महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. मात्र, त्याआधी कॅश कांडच्या घटनांमुळे राजकारण चांगलचं तापलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाला. त्यानंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या कंपनीच्या एका अधिकाऱ्याला नोटा वाटतान पकडलं. हा वाद थांबलेला नसताना, कॅश कांडच आणखी एक प्रकरण समोर आलय. इनोवा कारमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. गोरेगाव पूर्व दिंडोशी विधानसभेचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांच्याशी संबंधित ही कार असल्याची चर्चा आहे.

ही इनोवा कार मंत्री पार्क सोसायटीच्या समोर उभी होती. यातून रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलीस कार जप्त करुन पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. या कारवर शिंदे गटाच्या नेत्याचा स्टीकर होता. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. गाडी सापडलेले पैसे कोणाचे आहेत? याचा शोध सुरु आहे. निवडणुकीआधी इतकी मोठी रक्कम का ठेवण्यात आली होती?

हे सर्व आरोप फेटाळले

याआधी मंगळवारी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाला होता. यावरुन मोठा गदारोळ झाला होता. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर 5 कोटी रुपये आणून वाटल्याचा आरोप केला होता. विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, असं तावडे यांनी म्हटलं आहे. सीसीटीव्ही चेक करावे, त्यानंतर सत्य समोर येईल. “नालासोपारा येथे आमदारांची बैठक होती. म्हणून मी आदर्श आचार संहिता आणि वोटिंग मशीन सील करण्याची पद्धत समजावण्यासाठी गेलो होतो” असं तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं.

मोहितेकडे पोलिसांना एक यादी सुद्धा सापडली

शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती एग्रो कंपनीचे अधिकारी मोहिते यांना पैसे वाटताना पकडलं. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आकर्षिक करण्यासाठी नोट वाटप सुरु होतं. या दरम्यान त्यांना पकडलं. मोहितेकडे पोलिसांना एक यादी सुद्धा सापडली आहे. या लिस्टमध्ये सर्व माहिती आहे. आतापर्यंत किती लोकांना पैसे दिलेत आणि किती लोकांना वाटायचे आहेत.