गोंदियाचा आढावा | विधानसभा निवडणुकीत कौल कुणाला?
गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या जिल्ह्यातील चार पैकी तीन विधानसभा या भाजपाच्या ताब्यात आहेत.
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या जिल्ह्यातील चार पैकी तीन विधानसभा या भाजपाच्या ताब्यात आहेत.
गोंदिया विधानसभा (Gondia Vidhan sabha)
गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल हे विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी भाजपचे विनोद अग्रवाल यांचा पराभव केला होता. गोंदिया हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा आहे. तरीही इथून सतत काँग्रेसचे गोपाळ अग्रवाल हे निवडून येत आहेत. त्यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्राचा बराच विकास केला आहे
अर्जुनी मोरगाव विधानसभा (Arjuni Morgaon Vidhan sabha)
काँग्रेसचे राजेश नांदगावली यांचा पराभव करून भाजपचे राजकुमार बडोले यांनी थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलं. त्यांनी अनेक प्रभावशाली निर्णय घेऊन मागासवर्गीय जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण या मतदारसंघातही काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपसाठी यंदाची लढाई अटीतटीची आहे.
तिरोडा विधानसभा (Tiroda Vidhan sabha)
भाजपचे विजय रहांगडाले विद्यमान आमदार आहेत. त्यांनी 2014 मध्ये अपक्ष उमेदवार दिलीप बनसोड यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा चांगली आहे.
आमगाव विधानसभा (Amgaon Assembly Constituency)
भाजपचे संजय पूरम हे विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या रामरतन बापू राऊत यांचा पराभव केला.
गोंदिया जिल्हा – 04 ( Gondia MLA list)
63 – अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले (भाजप)
64 – तिरोरा – विजय राहांगडाळी (भाजप)
65 – गोंदिया – गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)
66 – आमगाव – संजय पूरम (भाजप)