परभणीचा आढावा | परभणी जिल्ह्यावर वर्चस्व कोणाचं?
परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
परभणी : परभणी हा निजामकालीन जिल्हा आहे. पण पाठीमागून तयार झालेले जालना. नांदेडसारख्या जिल्ह्याचा परभणीच्या तुलनेत अधिक विकास झाला आहे. परभणी जिल्ह्याला प्रबळ इच्छाशक्ती असलेले राजकारणी लाभलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची बकाल अवस्था झालेली आहे. परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.
यावेळी शिवसेनेचे राहुल पाटील हे परभणीचे आमदार आहेत. पाथरी मतदार संघातून अपक्ष आमदार मोहन फड यांना भरघोस मते देऊन विधानसभेत पाठवलं होत. त्यानंतर आमदार मोहन फड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत खासदार संजय जाधव यांच्याशी वितुष्ट आल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानपरिषदेवर बाबाजानी दुऱ्हानी हे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. तर विपलव बाजोरीया हे आमदार आहेत. तर संजय जाधव हे शिवसेनचे खासदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाडीचं प्राबल्य आहे.
जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे तर महानगर पालिका काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पाथरी,जिंतूर,पालम नगरपालिका राष्ट्रवादीच्या तर गंगाखेड काँग्रेसच्या ताब्यात आहे. सेलू,मानवत आणि सोनपेठ या नगरपालिका भाजपच्या, तर पूर्णा, मानवत ह्या दोन नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. 9 पैकी 5 पंचायत समित्या आघाडीच्या ताब्यात आहेत तर 4 युतीच्या ताब्यात आहेत.
परभणी जिल्ह्यातील नेते
- बाबजानी दुऱ्हानी – राष्ट्रवादी- विधानपरिषद सदस्य
- विजय भांबळे- राष्ट्रवादी काँग्रेस –आमदार, जिंतूर
- डॉ. मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस- आमदार,गंगाखेड
- मोहन फड- भाजप आमदार- पाथरी
- राहुल पाटील- शिवसेना आमदार,परभणी
- विपलव बाजोरिया- शिवसेना,विधानपरिषद सदस्य-हिंगोली/परभणी
- संजय हरिभाऊ जाधव – शिवसेना, खासदार परभणी
जिल्ह्यातील समस्या –
- जिल्ह्यातून चार नद्या वाहत असताना सिंचन अनुशेष, कागदावरच सिंचन.
- जिल्ह्यातील अंतर्गत आणि बाह्य खराब रस्ते
- आरोग्य, शिक्षणासाठी सोयी उपलब्ध नाहीत.
- शासकीय मेडिकल कॉलज नाही, पदवीनंतरच्या शिक्षणासाठी इतरत्र जावं लागतं.
- एमआयडीसी नसल्याने मोठा उद्योग नाही, परिणामी तरुणांच्या हाताला काम नाही
- परभणी शहराला 15 दिवसातून पाणी मिळते.
- सिद्धेश्वर, एलदरीसारखी धरणं मृत साठ्यात आहेत.
- जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडली आहेत. येत्या काळात भीषण पाणीटंचाईची समस्या
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारा जिल्हा अशी नवी ओळख
- शेती हा एकमेव व्यवसाय
- जगात जर्मनी, भारतात परभणी असं म्हटलं जातं
- सततचा दुष्काळ आणि नैसर्गिक आपतीचं संकट
- आघाडीकडे असलेल्या स्थानिक स्वराज्य स्वस्थांना सरकार निधी देत नसल्याचा आरोप
- दळणवळणाची अपुरे साधन
- रेल्वे ब्रॉडगेजचा शेती व्यवसायाला फायदा नाही
- अवैध गुटखा,मटका,जुगार आणिवाळू तस्करी अग्रेसर जिल्हा
मागण्या-
- शासकीय मेडिकल कॉलेज
- उच्च शिक्षणाची सोय
- सूतगिरणी,
- शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग
- तरुणांच्या हाताला नोकऱ्या
- प्यायला आणि शेती उद्योगाला मुबलक पाणी —————————————- 1) पाथरी विधानसभा (Pathri Vidhan Sabha constituency)
- एकूण मतदार-3 लाख 33हजार 594
- पुरुष -1 लाख 74 हजार 144
- महिला-1 लाख 59 हजार 394
2014 ला पडलेली मते
(01) मोहन फड -69 हजार 081 (भाजप)
(02) सुरेश वरपुडकर-55 हजार 632 (कॉग्रेस)
(03) अब्दुला खान-46 हजार 304 (राष्ट्रवादी)
(04) मिराताई रेंगे -35 हजार 408
मोहन फड विजयी –69 हजार 081 (भाजप)
—————————————-
2) जिंतूर विधानसभा (Jintur Vidhan sabha)
- एकूण मतदार-3 लाख 24हजार 115
- पुरुष -1 लाख 67 हजार 779
- महिला-1 लाख 56 हजार 333
2014 ला पडलेली मते
(01) विजय भांबळे-1 लाख 06 हजार 912 (राष्ट्रवादी )
(02) रामप्रसाद कदम (बोर्डिकर)-79 हजार 554 (कॉग्रेस)
(03) संजय सडेगावकर 30 हजार 310 (भाजप)
विजय भांबळे विजयी-1 लाख 06 हजार 912 (राष्ट्रवादी )
—————————————-
3) परभणी विधानसभा (Parbhani Vidhan sabha)
एकूण मतदार-3 लाख 01हजार 208
2014 ला पडलेली मते
(01) डॉ.राहुल पाटील-71 हजार 584 (शिवसेना)
डॉ.राहुल पाटील विजयी- (शिवसेना ) —————————————-
4) गंगाखेड विधानसभा (Gangakhed Vidhan sabha)
एकूण मतदार-3 लाख 83 हजार 864
2014 ला पडलेली मते
(01) डॉ.मधुसुदन केंद्रे-राष्ट्रवादी 58 हजार415
(02) रत्नाकर गुठे 56हजार 126-(rsps)
डॉ.मधुसुदन केंद्रे विजयी- (राष्ट्रवादी )