Nitin Gadkari : ‘बटेंगे तो कटेंगे’ वर आता नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य, अशी केली फटकेबाजी, ठाकरे आणि मी शत्रू नसल्याचा केला दावा

Batenge to Katenge Nitin Gadkari : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात महायुतीचे सरकार पूर्ण बहुमताने येणार असे ते म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी बटेंगे तो कटेंगे आणि उद्धव ठाकरे या मुद्दावर त्यांची थेट मतं मांडली.

Nitin Gadkari : 'बटेंगे तो कटेंगे' वर आता नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य, अशी केली फटकेबाजी, ठाकरे आणि मी शत्रू नसल्याचा केला दावा
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 4:23 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेत येईल, असे ते म्हणाले. आता प्रचाराचा धुरळा खाली बसायला दोन दिवस उरले आहेत. त्यापूर्वी टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना त्यांनी अनेक मुद्दावर त्यांची थेट मतं मांडली. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानावर आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधावर त्यांची बाजू मांडली.

राज्यात कोणताच खेला नाही

टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने राज्यात चांगल्या योजना आणल्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे 23 तारखेनंतर राज्यात काही मोठा खेला, गेम होईल असे आपल्याला वाटतं नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आमच्या ताकदीवर आम्ही बहुमत खेचून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

बटेंगे तो कटेंगेवर थेट मत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बंटेंगे तो कटेंगे’ या वक्तव्यावर नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केले. माझ्या समजुतीनुसार, आपण जात, धर्म, भाषा आणि लिंग या आधावर विभागले जाऊ नये. आपण उलट संघटित झालं पाहिजे. आपण भारतीय आहोत आणि आपल्याला एकसंध राहायला हवे, असा त्यांचा संदेश आहे. त्यांनी सांगितले की आपण वेगवेगळे पक्ष आहोत आणि आपण युती केली आहे. आपण एक पक्ष आहोत, तर आपले एकच विचार मांडले गेले पाहिजे. प्रत्येक पक्षाची एक खास गोष्ट आहे. हे राजकारणात चालते आणि त्यामुळेच ही युती आहे, असे मत गडकरींनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरेंविषयी काय मत?

उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. राजकारणात आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाहीत. विचारांच्या आधारावर आमच्यात मतभेद आहेत. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. आम्ही विचारांच्या आधारावर एकमेकांविरुद्ध असू, अशी माझी समजूत आहे. निवडणुकीत सर्वच पक्ष मतदारांना मतदानासाठी आवाहन करतात. मी पण काँग्रेसच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो, असे ते म्हणाले. खरंतर निवडणुकीत कामगिरीवर चर्चा व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.