मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे रस्त्यावर उतरणार असून ते स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चाला सीएसटीमधून सुरुवात होणार असून, तो नंतर विधानभवनावर धडकणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
विधीमंडळात सायंकाळी पाच वाजता प्रमुख नेत्यांची बैठक
महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित
अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परब उपस्थित राहणार
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी
कर्नाटकमधून एकाला आटक
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून धमकीचा निषेध
धमकी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ
आगीच्या घटनांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून सवाल
रुग्णालयाला लागणाऱ्या आगीच्या घटना गंभीर – फडणवीस
दोषी लोकांवर कारवाई कधी होणार – फडणवीस
आरोग्य विभाग कोणाकडे आहे, त्याला निलंबित करा – फडणवीस
आगीच्या घटनांमध्ये अनेक जणांनी जीव गमावला
राज्य सरकारकडून अद्यापही कारवाई नाहीच – फडणवीस
अद्यापही कोरोनाचे संकट टळले नाही
आमदारांनी बोलून झाल्यावर मास्क घातले पाहिजे
अजित पवारांचा विधनभवनात आमदारांना सल्ला
कोरोनाचे नियमही पाळण्याचे केले आवाहन
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा
ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा – आंबेडकर
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
विधानभवन परिसरामध्ये गोंधळ
सरकारकडून दडपशाही, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
आदित्य ठाकरे यांच्या धमकीचा विषय गंभीर
मात्र विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय वळन देऊ नये
पुरावे असेल तर केंद्राकडे द्यावे
पुरावे असतील तर सनातन सारख्या संस्थांवर बंदी घालावी – फडणवीस
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या तपासावर नवाब मलिकांचे प्रश्नचिन्ह
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवतीला अडकवण्यात आले
नवाब मलिकांचे भाजपावर गंभीर आरोप
मलाही ट्विटरवर धमकी आली – मलिक
आदित्य ठाकरे यांना धमकी आली, आरोपी कर्नाटकमधून पकडला
कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे यांच्या सर्वांच्या हत्येचे कनेक्शन कर्नाटकमध्ये – मलिक
एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या
कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वाढवले
सरकार नेहमीच चर्चेसाठी तयार
मात्र एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाही
ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा विचार
परिवहन मंत्री अनिल परब यांची विधानसभेत माहिती
आतापर्यंत 25 हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती
वीजबिल वसुलीवरून सरकारवर निशाणा
सरकारचे धोरण शेतकरी विरोधी
गोपीचंद पडळकर यांचा आरोप
शोतकऱ्यांना 60 ते 70 हजारांचे बिल पाठवण्यात येतात
सरकार बिल कमी करायला तयार नाही
शेतकऱ्यांनी जगायचं कसं
पडळकरांचा राज्य सरकारला सवाल
अजित पवारांच्या हातात सत्ता दिल्यास ते अधिवेशन संपेपर्यंत राज्याला विकून मोकळे होतील, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली होती. आता या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांना राज्यात कोणी ओळखत नाही, बारामतीबाहेर त्यांची ओळख नाही, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्यात अर्थ नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
हिवाळी अधिवेशनचा आज दुसरा दिवस
विरोधकांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न
दरम्यान पुढे बोलताना राऊत यांनी म्हटले आहे की, ईडी, सीबीआय हे भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करतात. भाजपच्या इशाऱ्यावरूनच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई सुरू आहे.
मुंबई: हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. मात्र काल अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न दिसल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे झोड उठवली. या टीकेला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री सापडत नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. यावर पत्रकारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असता, आम्ही देखील संसदेच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधानांना शोधतच होतो, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच दोन तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री हे विधानभवनात येतील असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.