“देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपला वाटते” दानवेंच्या टीकेला काँग्रेसचे उत्तर
"दानवे साहेब , भाजपाला स्थापनेपासूनच वाटत आले आहे की, या देशात 'अमर अकबर अँथनी' कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत." असे उत्तर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिले
मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘अमर-अकबर-अँथनी’ अशा शब्दात महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेला काँग्रेसने उत्तर दिले आहे. “देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले आहे” असे उत्तर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिले आहे. (Congress Leader Satyajeet Tambe answers BJP Minister Raosaheb Danve Taunt Amar Akbar Anthony)
“दानवे साहेब , भाजपाला स्थापनेपासूनच वाटत आले आहे की, या देशात ‘अमर अकबर अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीसुद्धा ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये हीच शिकवण दिली आहे, इतिहास साक्ष आहे. बाकी, महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी !” असे ट्वीट सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
दानवे साहेब ,
भाजपाला स्थापनेपासूनच वाटत आले आहे की, या देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत.
द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीसुद्धा ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये हिच शिकवण दिली आहे, इतिहास साक्ष आहे.
बाकी, महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी ! https://t.co/iVWHpqiB84
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 21, 2020
(Congress Leader Satyajeet Tambe answers BJP Minister Raosaheb Danve Taunt Amar Akbar Anthony)
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असा टोमणा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, केंद्र सरकार तर मदत करतच आहे, असंही दानवे म्हणाले.
राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाले आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या पायाभरणीसाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
संबंधित बातम्या
अमर, अकबर, अँथनी पायात पाय घालून आपोआप पडतील, दानवेंचा महाविकास आघाडीला टोला
मला इंग्रजी येत नाही, इंग्रजीत बोललो तर जोक होतो : रावसाहेब दानवे
(Congress Leader Satyajeet Tambe answers BJP Minister Raosaheb Danve Taunt Amar Akbar Anthony)