शिवसेनेला 5 वर्ष मुख्यमंत्रिपद जवळपास निश्चित, 14-14-12 मंत्रिपदाचा फॉर्म्युला?
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महासेनाआघाडीच्या (Shiv sena full term CM post) पहिल्या समन्वय बैठकीत खातेवाटपांवर चर्चा झाली.
मुंबई : महाराष्ट्रात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित (Shiv sena full term CM post) झालं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महासेनाआघाडीच्या (Shiv sena full term CM post) पहिल्या समन्वय बैठकीत खातेवाटपांवर चर्चा झाली. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची काल पहिली समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडेच असेल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वारंवार सांगितलं आहे. मात्र अन्य मंत्रिपदांची वाटणी कशी करायची याबाबत समन्वय बैठकीत चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीनही पक्षांनी 14-14-12 असं मंत्रिपदाचं सूत्र ठरवल्याची माहिती आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रिपद हे पाचही वर्ष शिवसेनेकडेच असेल, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एक-एक उपमुख्यमंत्रिपद असेल, असंही सांगण्यात येत आहे.
14-14-12 मंत्रिपदाचा फॉर्म्युला
दरम्यान, तीनही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. याशिवाय तयार केलेल्या मसुद्यात शिवसेनेला पूर्णकाळ मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक-एक उपमुख्यमंत्री असतील. सध्या चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळण्याचे संकेत आहेत. दोन्ही पक्षांना उपमुख्यमंत्रिपदेही मिळतील.
महत्त्वाची खाती सर्वांच्या वाट्याला
महत्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एका पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात. त्यानुसार गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता आहे. तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता आहे.
नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची चिन्हं आहेत. तर ग्रामीण भागाची कृषी, सहकार, ग्रामविकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात.
राष्ट्रपती राजवट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापन करण्यात मोठे पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर 12 नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल
- भाजप – 105
- शिवसेना – 56
- राष्ट्रवादी – 54
- काँग्रेस – 44
- बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
- प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
- एमआयएम – 02
- समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
- मनसे – 01
- माकप – 01
- जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
- क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
- शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
- रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
- स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
- अपक्ष – 13 – (8 अपक्ष भाजपसोबत, 5 अपक्ष शिवसेनेसोबत)
- एकूण – 288