महासेनाआघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द
महासेना आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई : महासेना आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना (meeting with governor postponed ) भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. महासेनाआघाडीचे नेते ओल्या दुष्काळासंदर्भात राज्यपालांना (meeting with governor postponed ) भेटणार होते. त्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र जमत होते, मात्र ऐनवेळी ही भेट रद्द झाली.
याबाबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भेट रद्द झाल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. शिंदेंनी जारी केलेल्या पत्रकानुसार, “शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि या तीनही पक्षांचे एक शिष्टमंडळ आज दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ४.३० वाजता राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, उपरोक्त तीनही पक्षांचे महत्वाचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा, नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी तसेच निवडणूक आयोगकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करणेसाठी आपापल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे माननीय राज्यपाल महोदय यांची आजची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. मानानीय राज्यपाल महोदय यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटीची पुढील वेळ लवकरच कळविण्यात येईल”, असं म्हटलं आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागितली होती. राजभवनावर तिन्ही पक्षांकडून नेमके कोणते नेते जाणार, हे स्पष्ट नव्हतं. मात्र तिन्ही पक्षाचे नेते पहिल्यांदाच उघडपणे एकत्र राज्यपालांची भेट घेणार होते, त्यामुळे या भेटीकडे राज्याचं विशेष लक्ष होतं.
राष्ट्रपती राजवट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापन करण्यात मोठे पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर 12 नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
संबंधित बातम्या
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली