महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर, 10 राज्यमंत्र्यांकडे एकूण किती खाती?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात एकूण दहा मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीला चार, शिवसेनेला चार तर काँग्रेसला दोन राज्यमंत्रिपदं मिळाली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली (Thackeray Government Portfolio Announced). त्यानंतर महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर झालं. गेल्या काही दिवसांपासून या खातेवाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. खातेवाटपाला उशिर होत असलेल्या सरकारबाबत अनेक उलट-सुलट चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र, आज अखेर हे खातेवाटप जाहीर झालं आहे आणि या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला आहे (Thackeray Government Portfolio Announced).
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात एकूण दहा मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीला चार, शिवसेनेला चार तर काँग्रेसला दोन राज्यमंत्रिपदं मिळाली. खाते वाटपात या दहा राज्यमंत्र्यांकडे एकूण 58 खाती देण्यात आली आहेत. ती खाती कोणती आणि कुठल्या मंत्र्याला कुठली खाती ते पुढीलप्रमाणे –
शिवसेना – राज्यमंत्री – 4
1. अब्दुल सत्तार : 4 खाती
खाती : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
2. शंभूराज देसाई : 5 खाती
खाती : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
3. बच्चू कडू (प्रहार जनशक्ती) : 7 खाती
खाती : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
4. राजेंद्र येड्रावकर : 5 खाती
खाती : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
राष्ट्रवादी – राज्यमंत्री – 4
1. दत्तात्रय भरणे : 5 खाती
खाती : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
2. आदिती तटकरे : 7 खाती
खाती : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
3. संजय बनसोडे : 6 खाती
खाती : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
4. प्राजक्त तनपुरे : 6 खाती
खाती : नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
काँग्रेस – राज्यमंत्री – 2
1. सतेज पाटील : 6 खाती
खाती : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
2. डॉ. विश्वजीत कदम : 7 खाती
खाती : सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
संबंधित बातम्या :