मुंबई : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील खातेवाटपाला अद्याप मुहूर्त लागलेला नसतानाच महाविकासआघाडीतील पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला मात्र ठरल्याची माहिती (Guardian Minister Formula) आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा 13-13-10 असा पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरल्याचं म्हटलं जातं.
शिवसेनेला 13, राष्ट्रवादीला 13, काँग्रेसला 10 पालकमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाचे जितके आमदार आहेत,
त्यानुसार प्रत्येक पक्षाला पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना (56) आणि राष्ट्रवादी (54) यांचे आमदार जवळपास
समान असल्यामुळे दोघांना प्रत्येकी 13-13 पालकमंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत. तर काँग्रेसचे आमदार कमी (44) असल्यामुळे त्यांच्या वाट्याला 10 पालकमंत्रिपदं येऊ शकतात. खातेवाटपासोबतच पालकमंत्र्यांची नावं जाहीर होऊ शकतात.
फडणवीसांचे मंत्री की ठाकरे सरकार, कोण मालामाल, कोण गुन्हेगार?
विस्तारामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. 36 मंत्र्यांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद येणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
आधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत.
काही जिल्ह्यांचे संभाव्य पालकमंत्री (Guardian Minister Formula)
अहमदनगर – बाळासाहेब थोरात किंवा शंकरराव गडाख
बुलडाणा – डॉ राजेंद्र शिंगणे
बीड – धनंजय मुंडे
वाशिम – संजय राठोड