अकोला : भाजपची 2 मतं महाविकास आघाडीलाच मिळणार असा गौप्यस्फोट विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अमोल मिटकरी यांनी केला. भारतीय जनता पार्टीला चारीमुंड्या चीत करण्याकरिता महाविकास आघाडी सज्ज झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले, तिन्ही पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख पक्षश्रेष्ठी निकाल वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सर्व आपल्या आमदारांची बैठक घेतली. राज्यसभेमध्ये (Rajya Sabha) जी चूक झाली ती चूक आता विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad) होऊ नये, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्यामुळे वैयक्तिक पक्षाच्या ज्या ज्या वेळी पक्षप्रमुखांनी मीटिंग (Meeting) घेतली असेल त्यावेळी त्या पक्षाच्या आमदारांनी मनातली खदखद बोलून दाखवली असेल.
मात्र, शिवसेनेचा आज पक्ष स्थापना दिवस पण आहे. पण त्यामुळे हा महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. थोडा काही नाराजीचा सूर असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचे पालकत्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला चारीमुंड्या चीत करण्याकरिता महाविकास आघाडी सज्ज आहे. नाराजी दूर होईल, असं अमोल मिटकरी म्हणालेत. पण, नाराज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळं किती जणांची नाराजी दूर होणार हे विधान परिषदेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
थोडेफार काही तक्रारी असतील तर तसं नाही होणार. सर्व आमदारांची समजूत काढली जाईल. मात्र,हा प्रश्न महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेचा असल्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार आहेत. गुप्त मतदानातून हे दिसून येईल. उलट भाजपची दोन मत महाविकास आघाडीला पडणार आहे. त्याच्यामुळे उद्या चार वाजेपर्यंत आपण सर्वांनी वाट पाहावी. असं अमोल मिटकरी यांचा दावा असला, तर नक्की काय होणार हे उद्याच स्पष्ट होईल. भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांच्या वतीनं विजयाचे दावे केले जात आहेत. कुणाचा गौप्यस्फोट खरा ठरतो, हे निकालावर अवलंबून आहे.