महायुतीचा तिढा मिटला, सर्व घटकपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटकपक्षांची समजूत घालण्यात यश आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील, असं आश्वासन देण्यात आलंय. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा या निवासस्थानी भेट झाली. बैठकीत चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती महादेव जानकर यांनी बैठकीनंतर […]

महायुतीचा तिढा मिटला, सर्व घटकपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटकपक्षांची समजूत घालण्यात यश आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील, असं आश्वासन देण्यात आलंय. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा या निवासस्थानी भेट झाली.

बैठकीत चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती महादेव जानकर यांनी बैठकीनंतर दिली. रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल आजपासून भाजपात असतील आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्या प्रचाराला जाणारच. सध्या नाही मात्र, विधानसभेत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. घटकपक्षांवर अन्याय होणार नाही, योग्य तो सन्मान आणि भागीदारी दिली जाईल, असंही जानकरांनी सांगितलं.

कोल्हापूरमधून युतीच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह घटकपक्षांचे सर्व नेतेही उपस्थित असतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वात मोठा तिढा सोडवण्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांना यश आलंय. काही तासापूर्वीच जानकरांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती.

शिवसेना आणि भाजपने आतापर्यंत बहुतांश जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. पण आम्हाला सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची रासपची तक्रार होती. पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जानकरांनी भाजपवर टीका केली होती. शिवाय भाजपला एक दिवसाचा अल्टिमेटमही दिला होता. पण त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जानकरांची समजूत काढली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.