खोक्याचा ‘आका’ सुरेश धस, त्यालाच आरोपी करा, धनंजय मुंडे यांचे बंधू बरसले
दोघेही बहिण भाऊ मंत्री झाले म्हणून विरोधकांना खूपतं आहे. सुरेश धस किती धुतल्या तांदळाचा आहे? हे आज कळालं ना? आज त्यांचा खोक्या बाहेर पडला, खोक्याच्या प्रकरणात सुरेश धस सुध्दा सहभागी आहेत. कारण नसतांना धनजंय मुंडे यांना बदनाम केले जात आहे असेही अजय मुंडे यांनी म्हटले आहे.

एकीकडे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले त्याच रात्री एका ओबीसी तरुणाला चटके दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बीडच्या संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागला, त्यानंतर आता सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असलेल्या खोक्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या प्रकरणात आता धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे समोर आले आहेत, धनंजय मुंडे यांची आई काही नाराज नाही आमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अजय मुंडे यांनी केला आहे. आता सुरेश धस हेच खोक्याचे आका आहेत, त्यांनाच आता सहआरोपी करा अशी मागणी अजय मुंडे यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंवर त्यांची आई नाराज आहे असा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यावर धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते पुढे म्हणाले की आमच्या बाई परळीला राहत होत्या, मात्र घराचे काम सुरू आहे. त्यामुळे बाईंनी गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. धनंजय मुंडे गावाकडे आल्यानंतर गावाकडेच राहतात. सनसनाटी निर्माण करायची म्हणून आरोप केले जात आहेत. आमच्या बाईंविषयी जो आरोप झाला त्याबद्दल किती दिवस शांत बसणार. कुठल्याही गोष्टींना अर्थ नसताना कुटुंबाला नाहक बदनाम करण्याचे काम सुरू असून धनंजय मुंडेंच्या पाठीशी संपूर्ण मुंडे परिवार आहे असे अजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे समर्थन कोणी करूच शकत नाही. वेळोवेळी धनजंय मुंडे बोलत होते त्यामुळे मला बोलायची गरज वाटली नाही. आमच्या घरातील प्रमुखांवर आले असल्यामुळे मी आता बोलायला पुढे आलो आहे असेही अजय मुंडे यांनी म्हटले आहे.




धस केवळ आरोप करून जातात …
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या आईच्या बाबतीत केलेले सर्व आरोप खोटे आहेत. धनंजय मुंडे यांच्यापाठीमागे सर्व कुटुंब उभे आहे. आमच्या कुटुंबातील कोणीच धनंजय मुंडे यांच्यावर नाराज नाहीए..संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही गप्प आहोत. नाही तर आम्हाला ही बोलता येतं. सुरेश धसचा खोक्या बाहेर पडलाय खौक्याचा ‘आका’ सुरेश धस आहेत त्यांना सह आरोपी करावे अशी मागणी अभय मुंडे यांनी केली आहे.
सतीश उर्फ खोक्याची प्रॉपर्टी जप्त करा – राम खोडे
सतीश भोसले उर्फ खोक्या याची प्रॉपर्टी जप्त करण्याचे पत्र पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे देण्यात आले आहे. आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी या पत्रातून खोक्याची संपत्ती जप्त करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. सतीश भोसले याच्याकडे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी तसेच आलिशान गाड्या आहेत. याबरोबरच तो पत्ते खेळण्याचा शौकीन होता. त्यातून त्याने लाखो रुपयांची माया गोळा केल्याची माहिती आहे. अहिल्यानगर, आष्टी, पुणे, बीड जिल्ह्यांमध्ये तो पत्ते खेळायचा. तसेच राज्यात होत असलेल्या चोऱ्या, चोरी झालेले सोने यातून त्याने माया गोळा केली आहे. यात आमदार सुरेश धस यांचा देखील समावेश असून त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी राम खाडे यांनी केली आहे.