माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या फेरमतमोजणीत निकाल बदलला

सांगवी गटात निळकंठेश्वर पॅनलचे अनिल तावरे 20 मतांनी विजयी झाले आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या फेरमतमोजणीत निकाल बदलला
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 1:52 PM

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या फेरमतमोजणीत निकाल बदलला. राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलची जागा एकाने वाढली, तर सत्ताधारी चंद्रराव तावरेंच्या सहकार बचाव पॅनलची जागा एकने कमी झाली आहे. सुधारित निकालानुसार निळकंठेश्वर पॅनलला 21 पैकी तब्बल 17 जागांवर विजय मिळाला, तर सहकार बचाव पॅनलची जागा घटून चारवर गेली आहे.(Malegaon Election Result Change)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शर्थीने सत्ता खेचून आणली. सहकार बचाव पॅनलने केलेली फेरमतमोजणीची मागणी त्यांच्याच अंगलट आल्याचं चित्र आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयश्री मिळवत अजित पवारांनी 2015 च्या पराभवाचा वचपा काढला.

सांगवी गटात निळकंठेश्वर पॅनलचे अनिल तावरे 20 मतांनी विजयी झाले आहेत. अनिल तावरे यांना 5 हजार 839 तर सहकार बचाव पॅनलच्या रणजित खलाटे यांना 5 हजार 819 मतं मिळाली.

अजित पवारांनी प्रपंचात माती कालवली, 50 कोटी वाटून सत्ता मिळवली : रंजन तावरे

‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतल्यामुळे काल सकाळी (24 फेब्रुवारी) सुरु झालेली मतमोजणी काही काळ थांबली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही मतमोजणीची प्रक्रिया सुरु राहिली. बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (23 फेब्रुवारी) मतदान झालं होतं, तब्बल 92 टक्के मतदान झाल्याने निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव पॅनलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती.

विजयी उमेदवारांची यादी

गट नंबर 1 (माळेगाव)

संजय काटे- निळकंठेश्वर पॅनल बाळासाहेब भाऊ तावरे- निळकंठेश्वर पॅनल रंजन काका तावरे- सहकार बचाव

गट नंबर 2 (पणदरे)

तानाजी कोकरे- निळकंठेश्वर पॅनल केशवराव जगताप- निळकंठेश्वर पॅनल योगेश जगताप- निळकंठेश्वर पॅनल

गट नंबर 3 (सांगवी)

सुरेश खलाटे- निळकंठेश्वर पॅनल चंद्रराव  तावरे- सहकार बचाव अनिल तावरे- निळकंठेश्वर पॅनल

Malegaon Result Live Update

गट नंबर 4 (निरावागज)

मदनराव देवकाते- निळकंठेश्वर पॅनल बन्सीलाल आटोळे- निळकंठेश्वर पॅनल प्रताप आटोळे- सहकार बचाव

गट नंबर 5 (बारामती)

नितीन सातव- निळकंठेश्वर पॅनल राजेंद्र ढवाण- निळकंठेश्वर पॅनल गुलाबराव गावडे- सहकार बचाव

ब वर्ग

स्वप्नील जगताप – निळकंठेश्वर पॅनल सौ. संगीता कोकरे – निळकंठेश्वर पॅनल सौ. अलका पोंदकुले – निळकंठेश्वर पॅनल

रंजन तावरेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर करुन पैसा आणि दहशतीच्या बळावर निवडणूक जिंकल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आणि कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला. “त्याचबरोबर अजित पवारांनी घेतलेल्या गोपनीय शपथेचा भंग केला. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली. या निवडणुकीत 50 कोटी वाटप झाले” असा आरोप रंजन तावरे यांनी केला.

मतमोजणीवेळी दोन मतं बाद ठरवल्याने रंजन तावरे आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला होता. मतमोजणी कक्षातच हा वाद झाला होता. रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतला होता. मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही पाहूनच मोजणी सुरु करण्याची मागणी तावरेंनी केली होती.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनल’विरोधात सत्ताधारी चंद्रराव तावरे यांच्या समर्थकांचा ‘सहकार बचाव पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात होता. साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरील 21 जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण 56 उमेदवार होते. यामध्ये 14 अपक्ष उमेदवारांचाही समावेश होता.

शरद पवारांचा कारखाना

माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणूनच ओळखला जातो. शरद पवार हे या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत 1997 आणि 2015 च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र मागील निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला होता.

2015 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढून कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, असा चंगच अजित पवारांनी बांधला होता.

Malegaon Election Result Change

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.