ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिलं नाही, पंतप्रधान मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी भडकल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी (collector meeting) संवाद साधला. यावेळी विविध राज्यांचाही समावेश होता. मात्र पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही.

ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिलं नाही, पंतप्रधान मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी भडकल्या
ममता बॅनर्जी वि. नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 2:04 PM

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी (collector meeting) संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय यावेळी विविध राज्यांचाही समावेश होता. मात्र पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. स्वत: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) हजर होत्या. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला. (Mamata Banerjee alleges we were not allowed to speak in DM meeting with PM Naredra Modi )

केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला.

आम्हाला बोलूच दिलं नाही

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. मात्र भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही” भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ चूपचाप बसून होते. कोणीही काहीही बोललं नाही. आम्हाला व्हॅक्सीन अर्थात लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

कोरोना कमी होत असल्यांच मोदी म्हणाले. मात्र आधीही असंच झालं होतं. आम्ही तीन कोटी लसीची मागणी करणार होतो. मात्र काहीच बोलू दिलं नाही. या महिन्यात 24 लाख लसी मिळणार होत्या, मात्र केवळ 13 लाख लसी मिळाल्या, असं ममतांनी सांगितलं.

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

संबंधित बातम्या 

मांजरेकर, दामले, कोठारेंसह 50 दिग्गज कलाकारांशी चर्चा, राज ठाकरे म्हणाले, तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो

Mamata Banerjee alleges we were not allowed to speak in DM meeting with PM Naredra Modi

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.