नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी (collector meeting) संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय यावेळी विविध राज्यांचाही समावेश होता. मात्र पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. स्वत: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) हजर होत्या. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला. (Mamata Banerjee alleges we were not allowed to speak in DM meeting with PM Naredra Modi )
केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. मात्र भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही”
भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ चूपचाप बसून होते. कोणीही काहीही बोललं नाही. आम्हाला व्हॅक्सीन अर्थात लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
If states were not allowed to speak why were they called. All the Chief Ministers must protest for not being allowed to speak: West Bengal Chief Minister Mamata Banerjee on PM Modi’s interaction with DM’s of 10 States today pic.twitter.com/ipdm72K0Dd
— ANI (@ANI) May 20, 2021
कोरोना कमी होत असल्यांच मोदी म्हणाले. मात्र आधीही असंच झालं होतं. आम्ही तीन कोटी लसीची मागणी करणार होतो. मात्र काहीच बोलू दिलं नाही. या महिन्यात 24 लाख लसी मिळणार होत्या, मात्र केवळ 13 लाख लसी मिळाल्या, असं ममतांनी सांगितलं.
Mamata Banerjee alleges we were not allowed to speak in DM meeting with PM Naredra Modi