Mamata Vs CBI: ममतांचं आंदोलन सुरुच, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Mamata Vs CBI नवी दिल्ली/कोलकाता: लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध पोलीस यावरुन आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असा सामना सुरु आहे. मोदी सरकारविरोधात ममता बॅनर्जी धरणं आंदोलन कर आहेत. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना […]

Mamata Vs CBI: ममतांचं आंदोलन सुरुच, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

Mamata Vs CBI नवी दिल्ली/कोलकाता: लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध पोलीस यावरुन आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असा सामना सुरु आहे. मोदी सरकारविरोधात ममता बॅनर्जी धरणं आंदोलन कर आहेत. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना रविवारी कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राज्य सरकारच्या परवानगीविना सीबीआयने थेट पोलीस आयुक्तांवर छापा टाकल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आणि त्यांनी थेट मोदी सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरु केलं.

सुप्रीम कोर्टात सुनावणी या सर्व राड्यानंतर सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेत, शारदा चिटफंड चौकशीबाबत याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टात सीबीआयच्या या दोन अर्जांवर आज सुनावणी होणार 1. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी शरण यावं आणि चौकशीला सामोरं जावं, अशी पहिली याचिका सीबीआयने दाखल केली आहे. 2. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात अवमानाची याचिकाही सीबीआयने दाखल केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? सीबीआयचे अधिकारी रविवारी (3 फेब्रुवारी) संध्याकाळी रोज व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी तपासाकरीता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना बाहेरच अडवलं. एसआयटी टीमचे नेतृत्व करत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कागदपत्र आणि फाईल्स गमावल्याबद्दल तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी आयुक्तांच्या घरी पोहोचले होते. याबाबत त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र त्याचे काहीही उत्तर आले नाही. त्यानंतर 3 फेब्रुवारीला छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

यानंतर ममता बॅनर्जी थेट पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचल्या. रविवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी सीबीआयने विनापरवानगी धाड टाकल्याने त्याला विरोध म्हणून मोदी सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरु केलं. कोलकात्यातील मेट्रो स्टेशन इथं ममता बॅनर्जी आंदोलनाला बसल्या.

ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला कुणा-कुणाचा पाठिंबा?

ममता बॅनर्जींच्या या आंदोलनाला देशभरातील राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनात उतरले आहेत.

शारदा चिटफंड घोटाळा नेमका काय आहे?

एप्रिल 2013 मध्येच हा घोटाळा उघडकीस आला होता. सुमारे 10 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची शारदा ग्रुपने फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंदाजे 2 हजार 460 कोटींचा शारदा चिटफंड घोटाळा असल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालमधील शारदा ग्रुप या चिटफंड कंपनीने लोकांची फसवणूक केली, त्यासाठी आकर्षित करणाऱ्या ऑफर कंपनीकडून देण्यात आल्या. 15 महिन्यात पैसे दुप्पट मिळतील, यांसारख्या ऑफरचा यात समावेश होता. चार कंपन्यांच्या माध्यमातून अशा ऑफर देण्यात आल्या. मात्र, ज्यावेळी पैसे परत करण्याची वेळ आली, त्यावेळी या कंपन्यांना टाळे होते.

घोटाळ्याचं टीएमसी कनेक्शन काय आहे?

शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांचं नाव समोर आल्यानंतर, या घोटाळ्याला राजकीय वळण लागलं. कुणाल घोष यांनी या घोटाळ्यात तीन वर्षांचा तुरुंगवासही भोगला आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. कुणाल घोष यांनीच या घोटाळ्यात टीएमसीच्या इतर बड्या नेत्यांवर आरोप केले आहेत. तसेच, या घोटाळ्याच्या चौकशीवेळी एसआयटीचे अध्यक्ष राजीव कुमार होते. सध्या ते कोलकात्याचे पोलिस आयुक्त आहेत.

संबंधित बातम्या

LIVE : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय

ममतांच्या लढ्याला राज ठाकरेंचा पाठिंबा

छापा टाकण्यासाठी गेलेले सीबीआयचे अधिकारी कोलकाता पोलिसांच्या ताब्यात

बंगालमध्ये ममता विरुद्ध सीबीआय, ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.