नवी दिल्ली : 2000 च्या नोटे संदर्भात रिजर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतलाय. 2000 च्या नोचा बॅंकेत जमा करण्याच्या सुचना रिजर्व्ह बँकेने दिल्या आहेत. 30 सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. त्यावर तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ममता बॅनर्जी यांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
2000 रुपयांच्या नोटांचं आणखी एक लहरी आणि तुघलकी नोटाबंदीचं नाटक. रिजर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे सामान्य लोकांना पुन्हा एकदा प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. असे मोदी सरकारचे निर्णय हे जनतेच्या विरोधातील आहेत. जनता हे सगळं अशी हुकूमशाही लोक विसरणार नाहीत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
Another whimsical & Tughlaqi demonetisation drama of Rs.2000 notes will hit the common people hard once again by subjecting them to massive harassment. These imperious measures are meant to camouflage the fundamentally anti-people & crony capitalist nature of this regime. Such…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 20, 2023
राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही रिजर्व्ह बँकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी निर्य घेतल्याचं तेव्हा सरकारकडून सांगण्यात आलं. त्याचा काही फायदा झाला का? उलट भ्रष्टाचार वाढतच गेला आहे. तुमचं काय मत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी?, असं ट्विट कपिल सिब्बल यांनी केला आहे.
₹2000 notes scrapped
PM to Nation :
November 8, 2016
“The magnitude of cash in circulation is directly linked to the level of corruption”Cash in circulation :
2016 (17.7 lakh crores)
2022 (30.18 lakh crores)So :
Corruption increased !What say you PM ji ?
— Kapil Sibal (@KapilSibal) May 20, 2023
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरबीआयच्या निर्णयावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. आधी म्हणाले, दोन हजाराची नोट चलनात आणल्याने भ्रष्टाचार संपेल. आता म्हणतायेत दोन हजाराची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल. याच साठी मी म्हणतो पंतप्रधान शिकलेला असावा. अशिक्षित पंतप्रधानाला कुणी काहीही बोलून जातं. त्याला काही कळत नाही. भोगावं मात्र जनतेला लागतं, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.
पहले बोले 2000 का नोट लाने से भ्रष्टाचार बंद होगा। अब बोल रहे हैं 2000 का नोट बंद करने से भ्रष्टाचार ख़त्म होगा
इसीलिए हम कहते हैं, PM पढ़ा लिखा होना चाहिए। एक अनपढ़ पीएम को कोई कुछ भी बोल जाता है। उसे समझ आता नहीं है। भुगतना जनता को पड़ता है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 19, 2023