Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: “राज ठाकरे सत्तेसाठी लाचार”, मनीषा कायंदे यांची सडकून टीका

शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरेंच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Raj Thackeray: राज ठाकरे सत्तेसाठी लाचार, मनीषा कायंदे यांची सडकून टीका
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 10:07 AM

मुंबई: सध्या राज्यात राजकीय समीकरणं बदलत चालली आहेत. शिवसेना अन् भाजपमध्ये दुरावा आल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. आता भाजप मनसे युतीची चिन्हे आहेत. त्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरेंच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “राज ठाकरे सत्तेसाठी लाचार झाले आहेत”, असं मनिषा कायंदे (Manisha Kayande) म्हणाल्या आहेत.

राज ठाकरे लाचार!

राज ठाकरे यांनी अनेकदा जाहीर सभांमधून भाजपवर सडकून टीका केली. किती ती सत्तेसाठी लाचारी… ज्या लोकांनी तुम्हाला शिव्या घातल्या सत्तेसाठी आज त्याच लोकांसोबत जाताय. हे अवघा महाराष्ट्र पाहातोय, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

भाजप-मनसे युती होणार?

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मधल्या काळात त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलून भगवा केला. भाजपने शिंदेगटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मनसे-भाजपची सलगी वाढताना दिसतेय. अश्यात आता मनसे आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या भेटीगाठी पाहता मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसे-भाजप युती झाली तर वावगं वाटायला नको.

शिवसेना दसरा मेळावा घेते. म्हणून यांनाही आता दसरा मेळावा घ्यायचा आहे. लोक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी तिथं येतात. आता लोकांना उद्धव ठाकरेंना ऐकायचं असतं, त्यामुळे कुणी काहीही बोललं. कितीही मेळावे घेतले तरी सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे, असंही मनिषा कायंदे म्हणल्यात.

हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरुन शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला गेले. सुर गोव्याला गेले, हिंदुत्वासाठी तिकडे गेलो असं म्हणतात. पण वास्तव लोकांच्या लक्षात आलं आहे, असंही मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.